स्वाभिमानी'चा बांधकाम विभागाविरोधात एल्गार

पावसाने खराब झालेले रस्ते दुरुस्त करण्याची मागणी

दहिवडी : सार्वजनिक विभागाच्या बांधकाम विभागाच्या हद्दीत येणाऱ्या रस्त्यांची माण'मधील पावसाने दुर्दशा झाली असून बांधकाम विभागाने वेळीच लक्ष दिले नाही तर रस्त्यावर निर्माण झालेल्या खड्डयांवरून अपघात  घडण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू मुळीक सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात एल्गार केला आहे.पावसाने सर्वत्र रस्ते खराब होऊ लागलेत, त्याचबरोबर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांत साचलेल्या पाण्यामुळे वाहनधारकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. बांधकाम विभागातर्फे या बाबीची दखल वेळीच घेतली नाही अन दुर्लक्ष केलं तर आणि दुर्घटना घडली तर सर्वथा बांधकाम विभाग जबाबदार राहील,असे राजू मुळीक यांनी म्हटले आहे.जर ही बाब गांभीर्याने घेतली नाही, रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती केली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना बांधकाम विभागाविरोधात रस्त्यावर उतरेल,असा इशाराही राजू मुळीक यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला