सातारा बाजार समितीत पराभव नसून नैतिक विजय : राजू शेळके
Satara News Team
- Fri 5th May 2023 03:52 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा तालुका बाजार समितीमध्ये शेतकरी पॅनेलचा चिवट लढा देवून झालेला पराभव हा पराभव जरी असला तरी तो नैतिक विजय असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिली आहे. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या पाठींब्यामुळे सुस्तावलेल्यांना आणि मतदारांना गृहीत धरणा - यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घामटा तर काढलाच परंतु पळता भुई थोडी केली ही वस्तुस्थिती नाकारुन चालणार नाही . झालेला पराभव भविष्यातील संघर्षमय विजयाची नांदी आहे असे राजु शेळके यांनी प्रसिद्धी पत्रकातून नमूद करत मतदार बंधू भगिनी व सातारा बाजार समितीच्या सर्व सभासदांचे आभार मानले.
पुढे बोलताना राजू शेळके यांनी माहिती दिली की, बाजारसमितीवर गेल्या अनेक वर्षापासून एकाधिकारशाही सुरु आहे . कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डातील गाळे शेती पुरक व्यवसाय सोडून दारु विक्री करणा - यांसह अन्य धनदांडग्या व्यापा - यांना दिले आहेत . बैल बाजार म्हणून असलेली जागेत मानवी बैलोबांचा धुमाकूळ सुरु आहे . परंतु या एकाधिकारशाही विरोधात कारखाना कार्यक्षेत्रातील शेतक - यांसह कोणीच आवाज उठवत नव्हते . अन्याय सहन करणे हाच मोठा अन्याय असल्याने , अल्पावधीत शेतकरी संघटनेने निवडणुक लढवण्याची तयारी केली . मुळात गेली अनेक वर्षे सत्तेत असल्यामुळे तसेच बाजार समितीचे त्यांना हवे तसे मतदार त्यांनी तयार करुन घेतल्यामुळे ही निवडणुक आम्हाला सोपी नव्हती . अनेक पध्दतीने त्यांच्या विचारांच्या नसलेल्या शेतक - यांना त्यांच्या हक्कापासून वंचित राहावे लागत होते . त्यामुळे अनेक प्रकारांनी पिचलेल्या शेतक - यांमध्ये , सभासदांमध्ये सत्ताधा - यांविरोधात असंतोष देखिल दिसत होता . त्यामुळेच आम्ही या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय समविचारी शेतक - यांशी चर्चा करुन घेतला . आमच्या प्रयत्नांना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी अत्यंत मोलाची साथ दिली. बाजारसमितीवर एकाधिकारशाही म्हणजे काय हे जवळुन अनुभवणा - यांनी या निवडणुकीत आम्हाला मनापासून साथ दिली , या सर्वांचे मनापासून निश्चितच आभार मानतोच , तथापि येणा - या काळामध्ये पाशवी सत्ताधिशांकडून , त्यांच्यावर काही अन्याय करण्याचा प्रयत्न झाल्यास , खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली , कायदयाच्या आणि न्यायाच्या माध्यमातुन शेतकरी हितासाठी आमचा संघर्ष सुरुच ठेवणार असल्याची ग्वाही राजू शेळके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिली.
एकराचे स्वप्न दाखवून अनेक व्यापा - यांची त्यांनी लुट केली आहे . ती केलेली लुट नगरपरिषदेच्या निवडणुकीत अंगलट येवू नये म्हणून या निवडणुकीत 17 एकर जागेचे तुणतुणे वाजवले . परंतु त्या अगोदर अनेक वर्षांची एक हाती कारभार केलेल्या बाजार समितीतील एकरांचा हिशेब एकदा मागवा म्हणजे आपले डोळे पांढरे होतील . आपला हा भ्रष्टाचाराचा ढोल साता - यातील सुज्ञ जनता रयतेच्या राजा असलेल्यांच्या साक्षीने फोडल्या शिवाय राहणार नाही असा विश्वास असल्याचे राजू शेळके यांनी सांगत विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.
या निवडणुकीच्या निमित्ताने सभासदांच्या आर्थिक नाडया आवळण्याचे प्रयत्न झाले . दडपशाही करण्याचा प्रयत्न झाला . सर्व प्रकारांचा आणि साम , दाम , दंड , भेद यांचा वापर करुन , ही निवडणुक सत्तारुढ अजिंक्य पॅनेलने निवडणुक लढवली . मतदारांचे आगत स्वागत आणि त्यांची विचारपूस करण्यात अजिंक्य पॅनेलची पळता भुई थोडी झाली होती ही वस्तुस्थिती सर्वांना दिसली . या लढतीमध्ये आम्ही ज्या ठिकाणी कमी पडलो त्याचा वस्तुनिष्ठ सखोल अभ्यास करुन , शेतकरी संघटनेची पुढील रणनिती आखण्यात येईल . या निवडणुकीच्या निमित्ताने सातारचे लोकप्रिय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शेतक - यांच्या आणि न्यायाच्या बाजुने उभे राहुन , शेतक - यांला जो भरभक्कम आधार दिला. तसेच होणा - या अन्याय अत्याचाराच्या विरोधात वाचा फोडण्यासाठी ठाम भुमिका घेतली . अनेक वर्षाच्या अनिबंध सत्तेच्या विरोधात , मर्यादित मतदार संख्या असतानाही आम्हाला सरासरी 400 मते मिळाली यातच आमचा नैतिक विजय असल्याचे जाणवते . बाजार समितीच्या गेल्या काही निवडणुका कधी आल्या आणि कधी झाल्या हे कळत देखिल नव्हते . वातानुकूलीत जागेत बसून उमेदवार शेतकरी मतदारांवर लादले जायचे , विरोध करण्याचे कुणाचे धाडस होत नव्हते . अश्या प्रतिकुल परिस्थितीत सर्वसत्ताधिश आणि निरंकुश दडपशाही विरोधात मतदार जागा झाला आहे . अन्यायाला विरोध करण्याचे बळ त्याच्यामध्ये येत आहे . येथुन पुढील निवडणुकीत हाच चारशेचा आकडा सत्तांतर घडवून आणल्याशिवाय राहणार नाही . म्हणूनच शेतकरी संघटना मतदार राजाची नेहमी ऋणी राहील असेही राजु शेळके यांनी शेवटी नमुद केले. आहे .
स्थानिक बातम्या
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Fri 5th May 2023 03:52 pm
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Fri 5th May 2023 03:52 pm
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Fri 5th May 2023 03:52 pm
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Fri 5th May 2023 03:52 pm
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Fri 5th May 2023 03:52 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 5th May 2023 03:52 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 5th May 2023 03:52 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Fri 5th May 2023 03:52 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Fri 5th May 2023 03:52 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Fri 5th May 2023 03:52 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Fri 5th May 2023 03:52 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Fri 5th May 2023 03:52 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Fri 5th May 2023 03:52 pm













