शिवछत्रपतींच्या घराण्यातील व्यक्तीला मंत्रीपद द्यावे, अन्यथा वीजवाहक टॉवरवरुन उडी मारुन जीवन संपवेन,,,, खा छ.उदयनराजेंचा तरुणाला फोन

सातारा : सातारा येथील शिवछत्रपतींच्या घराण्यातील व्यक्तीला मंत्रीपद द्यावे, अन्यथा वीजवाहक टॉवरवरुन उडी मारुन आपले जीवन संपवेन, अशी धमकी देणार्‍या होमगार्ड मध्ये जवान असणार्‍या एका तरुणाने आपला व्हिडिओ व्हायरल करीत एकच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर ही घटना खा. छउदयनराजेंना समजताच त्यांनी संबंधित तरुणाशी मोबाईलवरुन संपर्क करुन त्याचे समुपदेशन करीत त्याला आत्महत्त्या करण्यापासून परावृत्त केले. 

 याबाबत माहिती अशी की, सदाशिव ढाकणे रा. राजूर गणपती, जि. जालना येथील होमगार्ड असणार्‍या तरुणाने आज सकाळी हसनाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणार्‍या एका वीजवाहक टॉवर वर चढत सातारा येथील शिवछत्रपती घराण्यातील वंशजांना होऊ घातलेल्या मंत्रीमंडळाच्या विस्तारामध्ये कॅबिनेट मंत्रीपद द्यावे,

 चार तासांत याबाबतचा निर्णय मला कळवावा; अन्यथा मी या टॉवरवरुन उडी मारुन आपली जीवन संपवेन, असा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित करीत संबंधित युवकाने खळबळ उडवून दिली होती. त्याला वाचविण्यासाठी पंचक्रोशीतील लोकांसह स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचारीही खाली जमून त्यांनी उडी मारु नकोस, अशा विनंत्या केल्या होत्या. परंतू तरीही तो आपल्या निर्णयापासून परावृत्त होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांच्या मार्फत खा.छ उदयनराजेंपर्यंत हा सगळा प्रकार कळविण्यात आला.

 त्यानंतर खा.छ उदयनराजेंनी स्वत:च्या भ्रमणध्वनीवरुन संबंधित तरुणास फोन करुन त्याला उडी मारण्यापासून परावृत्त केले. यावेळी शिवछत्रपतींचे विचारही समजावून सांगितले. तसेच तुमच्यावर तुमच्या कुटूंबाची जबाबदारी आहे, याचीही जाणीव करुन दिली. तसेच येणार्‍या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये सातारच्या राजघराण्यातील व्यक्तीचा निश्‍चितपणे समावेश केला जाईल, याचीही हमी दिली.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त