खा. म्हणून उदयनराजे निवडून आले पण आ. म्हणून शंभूराजे यांचा पराभव...... शंभूराजे देसाई

पाटण : दौलत नगर मरळी येथे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा मेळावा आज पार पडला या मेळाव्यात बोलताना मंत्री शंभूराजे देसाई यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना पाटण विधानसभा मतदारसंघात कमी मतदान झाले असल्याने मी इथला आमदार म्हणून एकटाच जबाबदार आहे असे सांगत लवकरच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मला मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे असं सांगणार असल्याचं सांगितलं.

 

 

खासदार म्हणून उदयनराजे निवडून आले परंतु आमदार म्हणून मी पराभूत झालो त्यामुळे मी माझ्या मंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याने यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो मला मान्य असणार असल्याचा सुद्धा सांगितलं.

 

यावेळी बोलताना ते म्हणाले सत्ता माझ्या डोक्यात गेली नाही माझ्या कार्यकर्त्यांच्या डोक्यात सत्ता कशी गेली याचा खऱ्या अर्थाने विचार करण्याची गरज आहे. देसाई गटाच्या प्रमुखांनी शब्द टाकायचा आणि कार्यकर्त्यांनी यशस्वी करायचा. ही देसाई गटाची पद्धत आहे. मात्र खासदार उदयनराजे भोसले यांना पाटण मधून कमी झालेल्या मतदान पाहता हीच निवडणूक विधानसभेची असती तर निकाल काय लागला असता याबाबत मला आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं शंभूराजे देसाई म्हणाले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त