सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील शहीद जवान चंद्रकांत जाधव अनंतात विलीन 

सकाळी आठ वाजता कातळगेवाडी येथे त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आले. अंतिम दर्शनानंतर बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देऊन शासकीय इतमामात काताळकेवाडी स्मशानभूमी अग्नी देण्यात आला.

सातारा न्यूज - पुसेगाव : सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कातळगेवाडी येथील शहीद जवान चंद्रकांत जाधव यांचा आपली सेवा बजावत असताना चंदी मंदिर पंजाब येते हृदय विकाराच्या झटक्याने वीरमरण झाले आज त्यांचे पार्थिव सकाळी आठ वाजता कातळगेवाडी येथे त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आले. अंतिम दर्शनानंतर बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देऊन शासकीय इतमामात काताळकेवाडी स्मशानभूमी अग्नी देण्यात आला.


.     शहीद जवान चंद्रकांत जाधव यांचे पार्थिव येताच काताळगेवाडी  पंचक्रोशीतील तसेच तालुक्यातील हजारो उपस्थित नागरिकांनी शहीद जवान अमर रहे, भारत माता की जय, सर्व परिसर दणाणून गेला होता. रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी घालण्यात आली होती तर जागोजागी शहीद जवान अमर रहे  फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले होते. यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी अंतदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. अंत्यदर्शनासाठी, प्रशासकीय अधिकारी, राजकीय, सामाजिक, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शहीद जवान चंद्रकांत जाधव यांच्या पार्थिवाची गावातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी शहीद जवान अमर रहे भारत माता की जय आशा जय गोषाने परिसर दन दणाणून गेला होता. मिरवणूक झाल्यानंतर. त्यांचे पार्थिव कातळकेवाडी मशानभूमीत नेण्यात आले. त्या ठिकाणी त्यांना बंदुकीच्या फेरी व सलामी देऊन शासकीय इतमामात अग्नी देण्यात आला. शहीद जवान चंद्रकांत जाधव हे 44 वर्षाचे होते. त्यांनी 24 वर्षे फौजमध्ये सेवा केली यांचे शिक्षण इयत्ता पहिली ते चौथी काताळकेवाडी प्राथमिक शाळेत झाले. तर चौथी ते दहावी शिक्षण निढळ येथील विद्यालयात झाले व अकरावी बारावी शिक्षण महिमानगड विद्यालयात झाले. बारावीनंतर ते फौज 144 AAd रेजिमेंट मध्ये भरती झाले. त्यांनी 24 वर्षे फौज मध्ये देश सेवा केली. त्यांचा स्वभाव शांत संयमी  तसेच सर्वांमध्ये मिळून मिसळून असायचा श्रीकांत जाधव यांच्या बद्दल ग्रामस्थ व तसेच परिसरामध्ये आत्मीयता होती. एक महिन्यापूर्वी सुट्टीवर येऊन गेले होते. चंदी मंदिर वरून पंजाब येथे जात असताना त्यांना वाटेमध्ये अस्वस्थ वाटू लागले  होते. रस्त्याने जात असतानाच आपली सेवा बजावीत असताना  त्यांना हृदयविकाराच्या झटक्याने वीर मरण आले.  त्यांच्या जाण्याने काताळकेवाडी सह परिसरामध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. त्यांचे पाठीमागे आई-वडील तीन भाऊ पत्नी दोन मुले असा परिवार आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला