विधी विभागाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा १०० टक्के अवघड असल्याने वरिष्ठांकडे धाव !

As the final semester exam of law department is 100% difficult, rush to seniors!

सातारा : तीन वर्ष विधी विभागाच्या तसेच पाच वर्ष विधी विभागाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा पार पाडल्या असून १०० टक्के अवघड होत्या.म्हणून अध्ययनार्थीनी वरिष्ठांकडे तक्रार केलेल्या आहेत.सदरच्या परीक्षा गेल्या आठवड्यात ऑफलाइन MCQ पद्धतीने झाल्या होत्या. या परीक्षेत आयपीआर या विषयाचा पेपर १०० टक्के विद्यार्थ्याना अवघड गेला आहे.याचे गांभीर्य ओळखून  याबाबत तक्रारीचे निवेदन  मा. संचालक, परीक्षा व मध्यवर्ती मूल्यमापन केंद्र,शिवाजी विद्यापीठ तसेच मा. चेअरमन, विधी अभ्यास मंडळ,शिवाजी विद्यापीठ यांना देण्यात आले आहे. मा. कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ हे रजेवर असल्याने मा. संचालक,परीक्षा व मध्यवर्ती मूल्यमापन केंद्र,शिवाजी विद्यापीठ यांनी तक्रारीचे गांभीर्य ओळखून त्वरित प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या प्राध्यापकांकडून याबाबतीत लेखी खुलासा मागवून घेतलेला आहे.मा. कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ यांनी आम्हा सातही विधी कॉलेजच्या विद्यार्थी प्रतिनिधींना भेटीची वेळ दिल्याप्रमाणे मा. कुलगुरू यांच्याशी विद्यार्थी शिष्टमंडळाची तब्बल १.१५ तास चर्चा झाली. या चर्चेतील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत.संबधित प्रश्नपत्रिकेत एकूण ५ प्रश्न हे चुकीचे आहेत. हे आम्ही सप्रमाण दाखवून दिले आहे. १०० पॅटर्नच्या विद्यार्थ्यांवर कशाप्रकारे अन्याय होणार आहे ?  हे पटवून सांगण्यात आले आहे. प्रश्नपत्रिका तयार करताना फक्त काठिन्य पातळीलाच प्राधान्य देण्यात आले आहे. असेही सांगण्यात आले आहे. प्रश्नपत्रिका तयार करताना प्रत्येक यूनिटवर भर देण्यात आलेला नाही. हेही सप्रमाण दाखवून दिले आहे.अशा  पद्धतीने मुद्यांवर चर्चेदरम्यान  मा. कुलगुरुंनी मा.संचालक,परीक्षा व मध्यवर्ती मूल्यमापन केंद्र यांना प्रश्नपत्रिकेतील सर्व त्रुटी लिहून घ्यायला सांगून त्याप्रमाणे चौकशी अहवाल तयार करण्यास सांगितले आहे. शिवाय, आयपीआर  विषय वगळून  इतर तीन विषयांची उत्तरपत्रिका तपासण्याचे आदेश दिले आहेत. मा. कुलगुरुंनी आपल्या निवेदनाचा सकारात्मक विचार करून  विद्यार्थी हित जोपासण्याचे आश्वासन दिले आहे. आपण दिलेल्या या निवेदनाचा सकारात्मक विचार केला जाणार आहे.अशाही प्रतिक्रिया विद्यार्थी-विद्यार्थिनीनी दिलेल्या आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला