सासुच्या डोक्यात घातला दगड :पडले पाच टाके .. सूनेकडून सासुला मारहाण

माहेरच्याविरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याच्या रागातून

सातारा  : दरे खुर्द ता. सातारा येथे राहत असलेल्या पतीने पत्नीच्या माहेरच्या मंडळीविरूद्ध गुन्हा दाखल केला. यांचा राग मनात धरून पत्नीने सासुच्या डोक्यात दगड घालुन तिला जखमी केले आहे. यामुळे सुन पुजा रामचंद्र कोकरे हिच्या विरूद्ध सासु ताईबाई सोनबा कोकरे(वय 41) यांनी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पुजा कोकरे ही ताईबाई कोकरे यांची धाकटी सून आहे. तिच्यात व पती रामचंद्र कोकरे यांच्यात वाद झाला होता. या वादामुळे रामचंद्र याने पुजाच्या माहेरच्या मंडळीविरूद्ध गुन्हा दाखल केला. पुजाने यांचा राग मनात धरला होता. तोच रविवार दि. 31 रोजी 8 वाजण्याच्या सुमारास ताईबाई या मोठी सून सुनिता हिच्या सोबत बोलत बसल्या होत्या. यावेळी पुजा तिथे आली. व तिने दगड उचलून ताईबाईच्या डोक्यात घातला. दगड जोरात लागल्याने रक्तस्त्राव होऊ लागल्याने त्यांना रूग्णालयात नेण्यात आले. त्यांना पाच टाके पडले. यामुळे पुजाच्या विरूद्ध तालुका पोलीस ठाण्यात ताईबाईनी गुन्हा दाखल केला आहे. या गुह्याचा अधिक तपास तालुका पोलीस रमेश शिखरे करत आहेत

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला