निवडणुकीपुरतं उगवणाऱ्यांनी एक तरी काम केलं आहे का?.... सौ. वेदांतिकाराजेंचा सवाल; शिवेंद्रराजेंना मताधिक्य देण्याचे केले आवाहन
Satara News Team
- Mon 11th Nov 2024 12:49 pm
- बातमी शेयर करा
सातारा- आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून सातारा- जावली मतदारसंघात विकासपर्व सुरु आहे. सर्वत्र कोट्यवधींची विकासकामे मार्गी लावली आहेत. पाच वर्ष कधीही नजरेस न पडणारे विरोधक निवडणूक आली की मतांचा जोगवा मागत फिरत आहेत. निवडणुकीपुरतं उगवणाऱ्यांनी एक तरी काम केलं आहे का? त्यांना मते मागण्याचा नैतिक अधिकार आहे का? हा प्रश्न मतदारांनी विरोधकांना करावा आणि जनतेसाठी अहोरात्र झटणाऱ्या, विकासकामे मार्गी लावणाऱ्या आ. शिवेंद्रराजेंना विक्रमी मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.
सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सातारा शहरात विविध भागामध्ये पदयात्रांचा धडाका सुरु आहे. सोमवारी सकाळी सेनॉर चौक, आंदेकर चौक, बाबर कॉलनी, डॅनी पवार, झेंडा चौक, बाळासो भुजबळ घर, भैरवनाथ मंदिर, पटांगण ते जगन्नाथ किर्दत घर अशी भव्य पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, आरपीआयसह महायुतीतील सर्व घटकपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, दोन्ही आघाड्यांचे सर्व आजी - माजी पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. ठिकठिकाणी पदयात्रेचे फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आले. पदयात्रेत हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाल्याने पदयात्रा मार्गाला यात्रेचे स्वरूप आले होते. वेदांतिकाराजेंनी पदयात्रा मार्गावरील प्रत्येक घरात जाऊन नागरिकांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांच्याशी संवाद साधला.

सातारा शहरासह संपूर्ण मतदारसंघाचा कायापालट करून शिवेंद्रराजेंनी मतदारसंघाला 'आयडियल' मतदारसंघ बनवले आहे. प्रत्येकाच्या अडीअडचणीत धावून जाणारा, प्रत्येकाचे प्रश्न, समस्या सोडवणारा आपला हक्काचा माणूस म्हणजे शिवेंद्रराजेच आहेत. विरोधकांचे या उलट आहे. त्यांना जनतेचे काहीही घेणेदेणे नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी विरोधाला विरोध म्हणून निवडणूक लढवणाऱ्या अशा स्वार्थी लोकांना मतदारसंघातील जनतेने चांगलेच ओळखले आहे. त्यांच्या भूलथापांना जनता भुलणार नाही. जनतेच्या हक्काच्या शिवेंद्रराजेंचा विजय निश्चित आहे. पण, विक्रमी मताधिक्य देऊन एक वेगळा इतिहास घडवण्यासाठी सर्वांनी मतदान करावे आणि या ऐतिहासिक विजयात आपले योगदान द्यावे, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे यांनी केले.
मंगळवार दि. १२ रोजी सकाळी ७ वाजता समर्थ मंदिर, बोगदा, पापाभाई पत्रेवाले, रविंद्र ढोणे घर, खारी विहीर, महेश महाडिक घर, राजू भोसले घर, डफळे हौद, विश्वेश्वर चौक, गुजर आळी, कात्रेवाडा, हेडगेवार चौक, रमेश जाधव दुकान, चांदणी चौक ते राजवाडा अशी पदयात्रा, सायंकाळी ६. ३० वाजता महादेव मंदिर जवळ दौलतनगर आणि रात्री ८ वाजता विजय मंडळ शिर्के शाळा येथे कोपरा सभा होणार आहे. पदयात्रा आणि कोपरा सभेला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्थानिक बातम्या
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Mon 11th Nov 2024 12:49 pm
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Mon 11th Nov 2024 12:49 pm
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Mon 11th Nov 2024 12:49 pm
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Mon 11th Nov 2024 12:49 pm
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Mon 11th Nov 2024 12:49 pm
संबंधित बातम्या
-
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Mon 11th Nov 2024 12:49 pm
-
प्रशांत खुसे-पाटील यांच्या रुपाने खटाव तालुक्याला मिळणार युवा नेतृत्व
- Mon 11th Nov 2024 12:49 pm
-
साताऱ्यात शिवसेना (उबाठा) आंदोलनाचा फुसका बार
- Mon 11th Nov 2024 12:49 pm
-
मंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते १६ कोटींच्या विकासकामांचे होणार भूमिपूजन;जाहीर सभेचेही आयोजन
- Mon 11th Nov 2024 12:49 pm
-
एक मच्छर काय करतो ते नाना पाटेकरांना विचारा; आ.सचिन पाटलांचा रामराजेंना टोला
- Mon 11th Nov 2024 12:49 pm
-
मंत्री शिवेंद्रसिंहराजेच्या घरासमोर रक्तदान आंदोलन
- Mon 11th Nov 2024 12:49 pm
-
चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..
- Mon 11th Nov 2024 12:49 pm












