पोकलेन ब्रेकर चोरणाऱ्या चौघांना दहिवडी पोलीसांनी केले अवघ्या चार तासात जेरबंद !
सुमारे ७६ लाखांचा मुद्देमाल जप्त...Satara News Team
- Tue 25th Jul 2023 12:56 pm
- बातमी शेयर करा
दहिवडी: मुळीकवस्ती ता.दहिवडी गावाच्या हद्दीतून जिहे कठापूरच्या पाणीपुरवठ्याचे काम करणाऱ्या पोकलेन मशीनचा सुमारे १३ लाख ३३ हजार रुपये किंमतीचा ब्रेकर चोरून नेल्याप्रकरणी दहिवडी पोलिसांनी अवघ्या चार तासातचं संशयित रविराज जयप्रकाश गायकवाड (वय २५ वर्षे रा.दहिवडी ता.माण जि.सातारा),अनिल देवराम राठोड (वय ३० वर्षे रा.तुपेवाडी,दहिवडी ता.माण जि.सातारा),सुजित दिलीप कांबळे (वय २७ वर्षे रा.ढोकळवाडी पोस्ट विखळे ता.खटाव जि.सातारा हल्ली रा.तुपेवाडी दहिवडी) व अक्षय किसन जाधव (वय २६ वर्षे रा. चव्हाण वस्ती,वावरहिरे ता.माण जि.सातारा) यांना अटक करून त्यांच्याकडून चोरी गेलेला ब्रेकर सहित गुन्ह्यात वापरलेला जेसीबी,एक चार चाकी गाडी, ट्रॅक्टर ट्रॉली असा सुमारे ७६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे.याबाबत दहिवडी पोलीस स्थानकातून मिळालेली अधिक माहिती अशी दि.२३ रोजी सायंकाळी ५.०० ते दिनांक २४ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान मुळीक वस्ती ता दहिवडी गावाच्या हद्दीतून पोकलेन ब्रेकर चोरी झाल्याची फिर्याद श्रीनिवासराव सूर्यनारायणा रावपल्ली जनरल मॅनेजर आर.एम.एन.इन्फ्रा स्ट्रक्चर लि. रा.हैद्राबाद,तेलंगणा यांनी दहिवडी पोलीस स्थानकात दिली होती.गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे व त्यांच्या पथकाने घटनास्थळावरुन जाणाऱ्या रोडला व इतर परीसरात असणारे सुमारे ६० ते ६५ सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करुन त्यावरुन यांना निष्पन्न करुन त्यांना ताब्यात घेतले.त्यांचेकडुन सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल पोकलेन ब्रेकर एकूण किं.रु.१३ लाख ३३ हजार व संशयतांनी गुन्हा करण्यासाठी वापरलेला जेसीबी क्रमांक एम.एच ११ डी.एच १०००,ट्रॉलीसह ट्रॅक्टर क्रमांक के.ए.२८ टीए ६२०५,चार चाकी गाडी क्रमांक एम.एच.१२.क्युटी ३९६४ असा एकुण ७६ लाख ३३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे.सदर कारवाईत पो.हवालदार बापू खांडेकर,धनंजय घाटगे,पो.ना स्वप्नील म्हामणे,पो.कॉ रामचंद्र गाढवे,अजिनाथ नरबट,सुहास गाडे,सागर लोखंडे, निलेश कुदळे यांचा सहभाग होता
स्थानिक बातम्या
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Tue 25th Jul 2023 12:56 pm
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Tue 25th Jul 2023 12:56 pm
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Tue 25th Jul 2023 12:56 pm
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Tue 25th Jul 2023 12:56 pm
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Tue 25th Jul 2023 12:56 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 25th Jul 2023 12:56 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 25th Jul 2023 12:56 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Tue 25th Jul 2023 12:56 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Tue 25th Jul 2023 12:56 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Tue 25th Jul 2023 12:56 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Tue 25th Jul 2023 12:56 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Tue 25th Jul 2023 12:56 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Tue 25th Jul 2023 12:56 pm













