रणजितसिंह निंबाळकरांकडून फलटण नगरपरिषदेचे अधिकारी धारेवर..सर्वच विभागांमध्ये भोंगळ कारभार !
राजेंद्र बोंद्रे- Thu 12th Dec 2024 09:39 am
- बातमी शेयर करा
फलटण : फलटण नगर परिषदेच्या सर्वच विभागांमध्ये भोंगळ कारभार सुरू असून यात लवकरात लवकर सुधारणा करावी. विभाग प्रमुखांनी आपल्या विभागाची सखोल माहिती घ्यावी. येत्या आठ दिवसांत पुन्हा एकदा आढावा बैठक घेऊ, अशा सूचना माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी दिल्या आहेत.
फलटण नगर परिषदेच्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सभागृहामध्ये आयोजित आढावा बैठकीदरम्यान माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर बोलत होते.
यावेळी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील, मुख्याधिकारी निखिल मोरे, शहर पोलीस निरीक्षक नलवडे यांच्यासह नगरपरिषदेचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी फलटण नगर परिषदेच्या बांधकाम, पाणीपुरवठा, आरोग्य व बांधकाम परवाना विभागाची सविस्तर माहिती घेत सर्वसामान्य नागरिकांना ज्या अडीअडचणी भेडसावत आहेत त्या प्राधान्याने सोडवण्याच्या सूचना यावेळी दिल्या.
फलटण नगर परिषदेच्या हद्दीमध्ये असणाऱ्या सर्व रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण येणाऱ्या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये करणार असल्याची घोषणा यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली असून त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा थोडाफार त्रास सहन करावा लागणार आहे.
शहरातील रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करताना प्रत्येक १० मीटर वर पाणी पुरवठा, गटार व इतर गोष्टींसाठी जागा सोडण्यात येणार आहे. त्यामधूनच या सर्व गोष्टी करण्यात येणार आहे, असे यावेळी रणजितसिंह यांनी स्पष्ट केले.
स्थानिक बातम्या
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Thu 12th Dec 2024 09:39 am
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Thu 12th Dec 2024 09:39 am
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Thu 12th Dec 2024 09:39 am
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Thu 12th Dec 2024 09:39 am
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Thu 12th Dec 2024 09:39 am
संबंधित बातम्या
-
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Thu 12th Dec 2024 09:39 am
-
प्रशांत खुसे-पाटील यांच्या रुपाने खटाव तालुक्याला मिळणार युवा नेतृत्व
- Thu 12th Dec 2024 09:39 am
-
साताऱ्यात शिवसेना (उबाठा) आंदोलनाचा फुसका बार
- Thu 12th Dec 2024 09:39 am
-
मंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते १६ कोटींच्या विकासकामांचे होणार भूमिपूजन;जाहीर सभेचेही आयोजन
- Thu 12th Dec 2024 09:39 am
-
एक मच्छर काय करतो ते नाना पाटेकरांना विचारा; आ.सचिन पाटलांचा रामराजेंना टोला
- Thu 12th Dec 2024 09:39 am
-
मंत्री शिवेंद्रसिंहराजेच्या घरासमोर रक्तदान आंदोलन
- Thu 12th Dec 2024 09:39 am
-
चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..
- Thu 12th Dec 2024 09:39 am












