घरफोडीच्या २ गुन्ह्यांसह ८ मोटारसायकल चोरीचा छडा; आरोपींसह ६ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

सातारा : २४ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११.०० ते सायंकाळी ०६.३० वाजणेचे दरम्यान फिर्यादी शुभांगी संजय साबळे, वय - ४० वर्षे, रा. उडतारे ता. वाई जि. सातारा या शेतात गेल्या असताना कोणीतरी अज्ञात चोरटयाने देवळीत ठेवलेली घराची चावी घेवुन घरातील कपाटातील सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेली होती. याबाबत भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
   सदरचा गुन्हा उघड करणेबाबत पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सुचना दिल्या होत्या. गुन्हयाच्या तपासादरम्यान सदरचा गुन्हा कोणीतरी ओळखीच्या किंवा गावातील व्यक्तीने की ज्याला चावी कोठे ठेवतात हे माहित आहे त्यानेच केला असावा असा संशय निर्माण झाल्याने फिर्यादी यांचे घराचे शेजारी राहणारे, गावातील तसेच त्यांचे ओळखीचे लोकांकडे तपास केला परंतु गुन्हयाचे अनुशंगाने नक्की माहिती मिळत नव्हती. दरम्यान सदरचा गुन्हा उडतारे गावातीलच योगेश संदीप बाबर, वय- १९ वर्षे, रा. उडतारे ता. वाई जि.सातारा या अभिलेखावरील गुन्हेगाराने केला असल्याची विश्वसनीय माहिती प्राप्त झाली. त्याप्रमाणे त्यास गुन्हयात अटक करुन विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल करुन चोरी केलेले सोन्या चांदीचे दागिने त्याचा मामा रमेश दिनकर दुदुस्कर, वय- ४० वर्षे, रा. सोनगाव ता.जावली, जि.सातारा याचेकडे विक्रीसाठी दिल्याचे सांगीतले. त्याप्रमाणे त्याच्या मामाला गुन्हयात अटक करुन त्यांचेकडे सखोल तपास केला असता नमुद दोन्ही आरोपींकडुन भुईंज पोलीस ठाणे हददीत घडलेला आणखी एक घरफोडी चोरीचा गुन्हा तसेच भुईंज पो स्टे मोटारसायकल चोरीचे ४ गुन्हे उघड करण्यात आले आहेत.
गुन्हयातील अटक आरोपींकडे आणखी सखोल तपास केला असता त्यांनी मेढा तसेच सातारा तालुका पोलीस स्टेशनच्या हददीतील मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपींबाबत माहिती दिल्याने सदर परिसरातील २ संशयीत आरोपींना ताब्यात घेवुन त्यांचेकडे तपास केला असता त्यांनी सातारा तालुका पो स्टे - २ व मेढा पो स्टे - २ अशा ४ मोटारसायकल चोरीच्या गुन्हयांची कबुली देवुन चोरीच्या मोटारसायकल काढुन दिल्या आहेत.
अशा प्रकारे गुन्हयाचे तपासादरम्यान घरफोडी चोरीचे २ गुन्हे उघड करुन २ लाख ३० हजार रुपये किमतीचे ४ तोळे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व ४० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने तसेच मोटारसायकल चोरीचे ८ गुन्हे उघड करुन ४ लाख रुपये किमतीच्या ८ चोरीच्या मोटारसायकल असा एकुण ६ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. 
 पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापु बांगर,  उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती शीतल जानवे- खराडे यांचे मार्गदर्शनाखाली भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि रमेश गर्जे, पोलीस उप-निरीक्षक रत्नदीप भंडारे, पोलीस अंमलदार बापुराव धायगुडे, जितेंद्र इंगुळकर, आनंदा भोसले, शंकर घाडगे, रविराज वर्णेकर, सागर मोहिते, सोमनाथ बल्लाळ, सचिन नलवडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला असुन वर नमुद भुईंज पोलीस स्टेशनच्या पथकाचे पोलीस अधीक्षक सातारा, अपर पोलीस अधीक्षक सातारा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी वाई यांनी अभिनंदन केले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला