शेतीच्या कारणावरुन तुंबळ हाणामारी

तुंबळ हाणामारीत परस्पर विरोधी तक्रारी

वाई : वाई तालुक्यातील एका गावात दोन गटात शेतीच्या कारणावरुन ६ मे रोजी सकाळी ९ च्या सुमारास हाणामारीची घटना घडली. दोन्ही गटाकडून परस्पर विरोधात विनयभंग व मारहाणीच्या तक्रारी वाई पोलीस ठाण्यात दाखल केल्या आहे. शेतात नांगरटीच्या कारणावरून दोन्ही गटात बाचाबाचीचे रुपांतर तुंबळ हाणामारीत झाले. या हाणामारी महिलांचा विनयभंग झाला असून दोन्ही गटाने एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास वाई पोलीस करत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला