एसपी समीर शेख यांना विशेष सेवा पदक

नक्षलवाद्यांच्या कारवायांना आळा घातल्याबद्दल सन्मान
Special Service Medal to SP Sameer Shaikh

सातारा : समीर शेख यांच्यासह एकूण सात जणांना विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे. नक्षलवाद्यांच्या हिंसक व बेकायदेशीर कारवायांना परिणामकारक आळा घालण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल हे पदक जाहीर झाले आहे.


विशेष सेवा पदक जाहीर झालेल्यांमध्ये पोलिस अधीक्षक समीर शेख, फौजदार पारितोष दातीर, तेजस्विनी देशमुख, सचिन भिलारी, अविनाश गवळी मच्छिंद्रनाथ पाटील, प्रिया पाटील, अशी सातारा जिल्ह्यात सध्या कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांची नावे आहेत. एसपी समीर शेख यांची नोव्हेंबर २०२३ मध्ये सातारा पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली. त्याअगोदर २०२१ ते २०२३ या कालावधीत ते गडचिरोली येथे अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून बजावत होते. एसपी समीर शेख हे गडचिरोली येथे असताना त्यांनी पोलिस प्रशासनाची धुरा सांभाळली.याशिवाय अनेक मोहिमांमध्ये सक्रीय सहभाग घेवून त्या यशस्वी केल्या. दोन वर्षे तेथे सेवा बजावल्यानंतर साताऱ्यात पोलिस अधीक्षक म्हणून ते रुजू झाले.

 

'गडचिरोली पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून तेथील नागरिकांना वेगवेगळ्या योजना मिळण्यासाठी ही योजना पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी सुरु केली. समीर शेख यांनी ही अभिनव योजना सुरु करुन दोन वर्षात ते रेकॉर्डब्रेक अडीच लाख लोकांपर्यंत पोहोचले. यामुळे शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली. यासाठीच हे विशेष पदक जाहीर झाले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला