कोयत्याने वार करून खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुख्य आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने बारा तासाच्या आत केले जेरबंद
प्रकाश शिंदे - Wed 7th Jun 2023 02:14 pm
- बातमी शेयर करा
सातारा : काल रात्री 8:30 च्या सुमारास क्षेत्र माहुली तालुका जिल्हा सातारा येथील भाऊ जाधव यांच्या घरातील हॉलमध्ये भाऊ जाधव यांच्या मालकीच्या जागेमध्ये टाकलेली पान टपरी काढायला लावली म्हणून दोन इसमानी त्यांच्याकडे माफी मागण्याच्या बहाण्याने येऊन त्यांच्या कपाळावर डोक्यात तसेच डाव्या हाताच्या तळव्यावर व त्यांची पत्नी यांच्या उजव्या हाताच्या पंजावर ,तसेच भाऊ जाधव यांचा मित्र याच्या डाव्या कोपऱ्यावर उजव्या हाताच्या बोटावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याचा फिर्यादीवरुन सातारा शहर पोलीस ठाणे गु.र.नं. ४६२ / २०२३ भादविक ३०७, ३४ अन्वये गुन्हा नोंदगुन्हा दाखल झाला होता
गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक समीर शेख पोलीस उपअधीक्षक बापू बांगर यांनी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बोहरे व पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांच्या अधिपत्याखाली एक पथक तयार करून गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा मसूर फाटा येथे शेतात असल्याची गोपनीय माहिती मिळताच मुख्य आरोपीस ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या त्यांच्या पथकाने मुख्य आरोपीचा मसूर फाटा येथील शेतात रात्री शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन सातारा शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलेला आहे या गुन्ह्यातील आरोपी 12 तासाच्या चोरबंद केल्याने पोलीस अधीक्षक समीर शेख ,पोलीस उपाधीक्षक बापू बांगर यांनी अभिनंदन केले आहे
या कामी श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, प्रविण फडतरे, राकेश खांडके, मुनीर मुल्ला, गणेश कापरे, मोहन पवार, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, रोहित निकम, विशाल पवार, पृथ्वीराज जाधव, अमृत कर्पे यांनी सदरची कारवाई केलेली असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केलेले आहे.
आरोपीचे नाव
हर्षद संभाजी साळुंखे वय २१ वर्षे रा क्षेत्रमाहुली ता जि सातारा
स्थानिक बातम्या
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Wed 7th Jun 2023 02:14 pm
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Wed 7th Jun 2023 02:14 pm
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Wed 7th Jun 2023 02:14 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Wed 7th Jun 2023 02:14 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Wed 7th Jun 2023 02:14 pm
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Wed 7th Jun 2023 02:14 pm
-
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Wed 7th Jun 2023 02:14 pm
-
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Wed 7th Jun 2023 02:14 pm
-
मुंबईत गुन्हा, जावळीत लपाछपी; बॉलिवूड दिग्दर्शक नुरानीचा ‘फार्महाऊस प्लॅन’ मेढा पोलिसांनी उधळला!
- Wed 7th Jun 2023 02:14 pm
-
फलटण उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा खळबळ . (एका डॉक्टरची सुसाईड नोट वायरल.)
- Wed 7th Jun 2023 02:14 pm
-
फलटण नगरपरिषदेत कर वसुलीतील कथित अपहार उघड; संगणक परीचारकास अटक
- Wed 7th Jun 2023 02:14 pm
-
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 'थार' लांबवणारा भामटा जेरबंद
- Wed 7th Jun 2023 02:14 pm
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Wed 7th Jun 2023 02:14 pm











