पाचवड,मेढा,पाचगणी रस्ता;अपघाताच्या प्रमाणात वाढ
दारू पिऊन व निष्काळजी पणाने वाहन चालवीत असल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढSatara News Team
- Thu 29th Feb 2024 01:06 pm
- बातमी शेयर करा
पुणे - सातारा महामार्गावरील पाचवड ते कुडाळ,पाचगणी,मेढा या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले असून यात दारू पिऊन वाहन चालवणे,वाहन चालवताना निष्काळजीपणा,मोबाईलवर बोलणे,वाहतूक नियमाकडे दुर्लक्ष या सह बर्याच ठिकाणी वळणदार रस्ता घातक ठरत आहे.या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असून रस्ता गुळगुळीत व रुंदीकरण झाला असला तरी वाढत्या अपघाताची मालिका चिंता वाढविणारी दिसत आहे.
या मार्गावर मार्गदर्शक फलक व वळणावर दिशानिर्देशक बरेच ठिकाणी दिले नसल्याने हेही कारण अपघातास कारणीभूत ठरत आहे. पाचवड पाचगणी ते पाचवड मेढा या मार्गावरील डोंगरी भाग असल्यामुळे अनेक ठिकाणी वळणे आहेत.या वळणावर भरधाव जात असताना वाहन चालकांना कुठलाही अंदाज येत नाही.त्यात दारू पिऊन वाहन चालवणे,वाहन चालवताना निष्काळजीपणा,वाहतूक नियमाकडे दुर्लक्ष,वाहनाची वेळेवर देखभाल न करणे लहान मुलांना दुचाकी वाहन चालवण्यात देणे या सह अनेक अपघातामध्ये कारणाचा समावेश करता येईल.याच मार्गावर अमृतवाडी, सरताळे,म्हसवे वळणावर धोकादायक आणि अपघातग्रस्त ठिकाणे आहेत.येथे अनेक अपघात झाले आहेत.त्यात ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरासमोर धडक होण्याचे प्रकार खूप आहे. रस्त्याची रुंदी वाढविण्यात येऊन रस्ता गुळगुळीत असल्यामुळे या महामार्गावर वाहनांची वर्दळ व वेग वाढला आहे.पाचगणी,महाबळेश्वर या पर्यटणस्थळावर जाण्यासाठी या मार्गा वरुण वर्दळ वाढल्यामुळे वाहनांची या मार्गावर संख्या वाढली आहे.महामार्गालगत सहज मिळणारी दारू होणाऱ्या अपघाताला विशेष कारणीभूत ठरत आहे.रस्ता चांगला झाल्याने वाहनांचा वेग वाढलेला आहे. याठिकाणी दिशादर्शक आणि मार्गदर्शन सूचना फलकांचा अभाव आहे.संबंधित विभागाने रस्त्यावर फलक लावण्याची गरज असून या सोबतच ड्रिंक अँड ड्राइव्हवर कठोर निर्बंध आणून यासह वाहतूक नियमाविषयी वाहन चालकांमध्ये व्यापक जनजागृती करण्याची गरज
असल्याचीही वाहन चालकांकडून मागणी होत आहे.
स्थानिक बातम्या
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Thu 29th Feb 2024 01:06 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Thu 29th Feb 2024 01:06 pm
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Thu 29th Feb 2024 01:06 pm
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Thu 29th Feb 2024 01:06 pm
संबंधित बातम्या
-
फलटण तालुक्यात रानगव्यानंतर आता रानडुकराने केला शेतकऱ्यावर हल्ला.
- Thu 29th Feb 2024 01:06 pm
-
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Thu 29th Feb 2024 01:06 pm
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Thu 29th Feb 2024 01:06 pm
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Thu 29th Feb 2024 01:06 pm
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Thu 29th Feb 2024 01:06 pm
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Thu 29th Feb 2024 01:06 pm
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Thu 29th Feb 2024 01:06 pm
-
पुसेसावळी येथील युवकाने गळफास घेऊन संपवली जिवनयात्रा?.
- Thu 29th Feb 2024 01:06 pm












