जरंडेश्वर कारखाना घोटाळ्याची ACB विभागाकडून चौकशी सुरू... आजीत पवार यांना धक्का

कोरेगाव  : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांना अडचणीत आणणारी बातमी समोर आली आहे. अजित पवार यांच्याशी संबंधित कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याची पुन्हा एकदा राज्य सरकारकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे. पुणे लाचलुचपत विभागाकडून या कारखान्यातील गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरु करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा संपल्यानंतर चौकशी सुरु जरंडेश्वर साखर कारखान्याची चौकशी करण्यात आली असल्याचे एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित पुणे येथील लाचलुचपत विभागाकडून जरंडेश्वर कारखान्यातील गैरव्यहार, कोरेगाव येथील एक भुखंड आणि डिस्टलरी प्रकल्पासंदर्भात ही चौकशी सुरु करण्यात येत आहे. ईडीने जरंडेश्वर कारखान्याची चौकशी करुन चार्जशीट दाखल करण्यात आली होती. जरंडेश्वर कारखाना मेसर्स गुरू कमोडिटी सर्विसेस प्रा.लिमिटेडला विकण्यात आला. त्यानंतर हा कारखाना जरंडेश्वर कारखाना जरंडेश्वर शुगर मिल प्रायव्हेट लिमिटेडला भाडे तत्वावर देण्यात आला. तसेच जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काही भाग स्पार्कलिंग सोईल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा हिस्सा आहे.


जरंडेश्वर साखर कारखाना हा त्या वेळच्या आमदार शालिनीताई पाटील या चालवत होत्या. त्यावेळी कर्जात बुडालेल्या या कारखान्याला वाचवण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. अखेरीस हा कारखाना लिलाव प्रक्रियेत गेला आणि हा कारखाना गुरु कमोडिटी या प्रायवेट लिमिटेड कंपनीने लिलाव प्रक्रियेतून खरेदी केला. अजित पवार यांच्याशी संबंधित व्यक्तीने हा कारखाना घेतल्याची माहिती आहे. जरंडेश्वर लिलाव प्रक्रिया बोगस असल्याचा आरोप शालिनीताई पाटील यांनी केला होता. त्या अनुषंगाने त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. हायकोर्टाने या बाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखा मुंबई यांच्याकडे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर इडीकडून या सर्व प्रकाराची चौकशी सुरु करण्यात आली.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त