कास- यवतेश्वर रस्त्यावर दोन चारचाकीचा भीषण अपघात : तरूणी जागीच ठार

सातारा : कास- यवतेश्वर मार्गावर सिद्धटेक हॉटेल समोर दोन चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाला असून यामध्ये एक तरूणी जागीच ठार झाली आहे. तर 4 ते 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात दोन्ही गाड्याचे मोठे नुकसान झाले असून जखमींना साताऱ्यात उपचारासाठी हलविण्याची प्रक्रिया सुरू आहे. अपघातातील जागीच ठार झालेल्या तरूणीचे वय अंदाजे 20 ते 22 वर्षे असल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कास- यवतेश्वर रस्त्यावर होंडा सिटी आणि क्रेटा या दोन गाड्या समोरासमोर जोरदार धडकल्या. यावेळी अपघातात दोन्ही गाड्यातील लोक जखमी झाले असून एक तरूणी ठार झाली. सदरील माहिती मिळताच शिवेंद्रसिंहराजे भोसले ट्रेकर्स घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी जखमींना बाहेर काढायचे काम चालू आहे. अपघातातील एका गाडीचा नंबर (MH- 11-BV- 5568) असा आहे. दोन्ही गाडीचालक हे सातारा शहरातील असल्याचे समजत आहे. अपघाताच्या ठिकाणी दोन्ही चारचाकी गाड्यांची धडक झाल्यानंतर मोठा आवाज झाला. सिध्दटेक हाॅटेल येथील लोक घटनास्थळावर येवून जखमींना मदत करत सदरील घटना सातारा पोलिसांना कळवली आहे. अपघातातील जखमी हे सातारा शहरातील असल्याची माहिती मिळत आहे. जखमींना शहरातील खासगी दवाखान्यात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. सदरची घटना रात्री 9.30 ते 10 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला