राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारातून सातारा जिल्ह्यात दोन प्रमुख दावेदार 

आघाडी राज्य सरकार घालविण्यासाठी भाजपने अनेकदा प्रयत्न केले. पण, त्यांची डाळ शिजली नाही,सरकार पाडण्याचे भविष्य व मुहूर्त शोधून काढून ज्योतिष थकले.त्यांचा काडीमात्र उपयोग भाजपला झाला नाही. अखेर राजकीय पक्षांना जमले नाही ते सोळशी खोऱ्यातील जावळीचे वाघ एकनाथराव शिंदे यांनी करून दाखविले.

सातारा न्यूज/ सातारा : पंचायत समिती ते राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत बारामती येथून सातारा जिल्ह्यात येणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कथित लखोटा हद्दपार झाला आहे. आता धक्कातंत्र व निष्ठतेला प्राधान्य मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.भाजपशाही व शिंदेशाहीचा उदय झाल्याने माण-खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे व सातारा-जावळीचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मंत्री पदावरील दावे चांगलेच जड वाटू लागले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शह देण्यासाठी मोठी व्यहूरचना आखली जात असल्याने बऱ्याच कालावधीनंतर दिल्लीतून येणाऱ्या राजकीय निरोपाकडे नजरा लागल्या आहेत. 
           अडीच वर्षे महाविकास आघाडी राज्य सरकार घालविण्यासाठी भाजपने अनेकदा प्रयत्न केले. पण, त्यांची डाळ शिजली नाही,सरकार पाडण्याचे भविष्य व मुहूर्त शोधून काढून ज्योतिष थकले.त्यांचा काडीमात्र उपयोग भाजपला झाला नाही. अखेर राजकीय पक्षांना जमले नाही ते सोळशी खोऱ्यातील जावळीचे वाघ एकनाथराव शिंदे यांनी करून दाखविले. मी पुन्हा येईन सांगणाऱ्या ना मागे सारून सातारा जिल्ह्याच्या सुपुत्रांनी हारी हुवी बाजी जिंकून दाखवली आहे.आता सातारा जिल्ह्यात कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार? याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.  

 

  शिवसेना-भाजप युतीच्या वेळी शिवसेनेला पाच कॅबीनेट व सात राज्यमंत्री पदे मिळाली होती.त्यानंतर महाविकास आघाडीत सातारा जिल्ह्यात एक सहकार मंत्री व एक गृह राज्यमंत्री, विधानपरिषद सभापती असे अवघे तीन लाल दिवे मिळाले होते.आता सध्या सातारा जिल्ह्यात मंत्री पदासाठी प्रमुख चार दावेदार आहेत. भाजपचे माण-खटावचे आ. जयकुमार गोरे, सातारा-जावळीचे आ शिवेंद्रसिंहराजे भोसले व शिवसेना पाटणचे शँभुराज देसाई आणि कोरेगावचे महेश शिंदे हे आहेत. पूर्वीच्या मंत्रिमंडळात गृह राज्यमंत्री शँभुराज देसाई यांनी अडीच वर्षे कामकाज पाहिले आहे. त्याचा लेखाजोखा सर्वश्रुत आहे. आ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे भाजपसोबत जेवढे घनिष्ठ संबंध आहेत. तेवढेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवारांशी चांगले संबध आहेत. विकास कांमासाठी त्यांना भरपूर निधी उपलब्ध झाला आहे. तर महेश शिंदे हे नावाला शिवसेना आमदार असले तरी त्यांची भाजपशी जवळीक लपून राहिली नाही. राहता राहिले माण-खटावचे आ. जयकुमार गोरे यांनी गेली पंधरा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत अनंत अडचणींना तोंड देत संघर्ष सुरू ठेवला आहे. त्याचे त्यांना बक्षीस मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ओ बी सी व मराठा समाजाला हाताशी धरून ते राजकारण करीत असले तरी मागासवर्गीय व अल्पसंख्याक समाज आजच्या घडीला त्यांच्या सोबत नाही, हे सुध्दा लक्षात ठेवण्यासारखे आहे. तसं पाहिलं तर मंत्री पदाचे सातारा जिल्ह्यातील दोन आमदारांवर  अट्रोसिटी चे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.त्याला राजकीय झालर आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळात कोणाला मंत्री पद मिळेल?हे सध्या तरी सांगणे कठीण असले तरी माण-खटावचे आ. गोरे व सातारा-जावळीचे आ. भोसले यांचे पारडे सध्या तरी जड वाटत आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत सुरत- गुवाहाटी-गोव्यात गेलेल्या सर्वानाच मंत्री करणे कठीण असल्याने  काहींना थांबावे लागणार आहे.त्यामध्ये कोण असेल? हे सुध्दा गोपनीय ठेवण्यात आले असल्याचे बोलले जात आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला