महिलेस धमकी व शिवीगाळ प्रकरणी बाळू काळेवर गुन्हा दाखल..
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून अशोभनीय कृत्यSatara News Team एकनाथ वाघमोडे
- Wed 13th Jul 2022 01:05 pm
- बातमी शेयर करा
माजी सरपंच बाळासाहेब किसन काळे यांनी सामाजिक वनीकरणाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी भाग्यश्री ठाकूर यांना मोबाईल वरुन अश्लील शिवीगाळ केली तसेच काम कसे करता तेच बघतो, तुम्हाला आठ दिवसांत कळेलच अशी धमकी दिली.
दहिवडी : सामाजिक वनीकरणाच्या महिला वनपरिक्षेत्र अधिकारी यांना अश्लील शिवीगाळ करुन सरकारी काम करत असताना धमकी दिल्याप्रकरणी दिडवाघवाडीचे (ता. माण) माजी सरपंच बाळू काळेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दिडवाघवाडी गावात सामाजिक वनीकरण विभागामार्फत मंजूर करण्यात आलेले वृक्ष लागवडीचे काम सुरु करण्यात येत होते. सदरचे काम मी मंजूर करुन आणलेले असताना मला न विचारता कसे करत आहात असे म्हणत गावाचे माजी सरपंच बाळासाहेब किसन काळे यांनी सामाजिक वनीकरणाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी भाग्यश्री ठाकूर यांना मोबाईल वरुन अश्लील शिवीगाळ केली तसेच काम कसे करता तेच बघतो, तुम्हाला आठ दिवसांत कळेलच अशी धमकी दिली.
या घटनेनंतर भाग्यश्री ठाकूर यांनी बाळासाहेब काळे यांच्या विरोधात दहिवडी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमध्ये असे म्हणण्यात आले आहे की. दिडवाघवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये वृक्ष लागवडीचे काम सुरू असताना दिडवाघवाडी गावचे माजी सरपंच बाळासाहेब किसन काळे त्या ठिकाणी गेले आणि तेथे काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धमकी दिली की काम बंद करा. मला विचारल्याशिवाय काम सुरू करायचे नाही. असे सांगून त्या वेळेस काम बंद पाडले. सदरचे काम बंद का केले खा जाब विचारण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी भाग्यश्री ठाकूर यांनी त्यांना ऑफिसला बोलावून जाब विचारला असता त्यांनी सांगितले की मी दिडवाघवाडी चा सरपंच असताना हे काम मंजूर करण्यासाठी प्रस्ताव दिला होता. त्यामुळे हे काम मला विचारात न घेता तुम्ही कसे सुरू केले आणि मला विचारल्याशिवाय काम सुरू केले तर याद राखा. तालुक्यामध्ये तुम्ही कसे काम करताय तेच बघतो. आठ दिवसांमध्ये तुम्हाला दाखवतो. अशी धमकी देऊन ऑफिसमधून निघून गेले.
त्यानंतर दिडवाघवाडी च्या हद्दीत झाडे लावण्याचे काम दिलेले शिंगणापूर गावचे दादासाहेब बाळू शिंगाडे यांनी बाळासाहेब किसन काळे यांना त्यांच्या फोन वरून फोन लावला असता त्यांनी वन परिक्षेत्र अधिकारी भाग्यश्री ठाकूर यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. व तालुक्यात कसे काम करते ते दाखवतो. भाग्यश्री ठाकूर यांचे पती सूर्यभान जाधव यांनादेखील शिवीगाळ करत म्हणाले की बायकोचा जास्त पुळका येतोय तर घरी ठेवायची अशा प्रकारची धमकी व शिवीगाळ केला कारणास्तव दहिवडी पोलीस ठाणेमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक देवानंद तुपे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.
crime
स्थानिक बातम्या
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Wed 13th Jul 2022 01:05 pm
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Wed 13th Jul 2022 01:05 pm
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Wed 13th Jul 2022 01:05 pm
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Wed 13th Jul 2022 01:05 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Wed 13th Jul 2022 01:05 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Wed 13th Jul 2022 01:05 pm
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Wed 13th Jul 2022 01:05 pm
-
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Wed 13th Jul 2022 01:05 pm
-
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Wed 13th Jul 2022 01:05 pm
-
मुंबईत गुन्हा, जावळीत लपाछपी; बॉलिवूड दिग्दर्शक नुरानीचा ‘फार्महाऊस प्लॅन’ मेढा पोलिसांनी उधळला!
- Wed 13th Jul 2022 01:05 pm
-
फलटण उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा खळबळ . (एका डॉक्टरची सुसाईड नोट वायरल.)
- Wed 13th Jul 2022 01:05 pm
-
फलटण नगरपरिषदेत कर वसुलीतील कथित अपहार उघड; संगणक परीचारकास अटक
- Wed 13th Jul 2022 01:05 pm
-
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 'थार' लांबवणारा भामटा जेरबंद
- Wed 13th Jul 2022 01:05 pm
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Wed 13th Jul 2022 01:05 pm











