वाढती गुन्हेगारी ही सामाजिक समस्या - मा. सुधीर वाळुंज
बापू वाघ - Fri 20th Jan 2023 01:50 pm
- बातमी शेयर करा
वाई : वाई महाविद्यालयीन जीवनात एकतर विद्यार्थी घडतो किंवा बिघडतो. विद्यार्थी घडण्यामागे एन.एस.एसचा मोठा वाटा असतो, तर क्षणिक स्टंटबाजी व आकर्षणातून जीवन बिघडते. यातून गुन्हेगार तयार होतात आज-काल वाढती गुन्हेगारी ही मोठी सामाजिक समस्या झाली आहे. असे प्रतिपादन वाईचे पोलीस उपनिरीक्षक मा. सुधीर वाळुंज यांनी केले.
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या मौजे पसरणी येथील विशेष श्रमसंस्कार शिबिरात ते वाढती गुन्हेगारी व त्यावरील उपाय या विषयावर प्रबोधनपर व्याख्यान देताना बोलत होते. ग्रामस्थ दत्तात्रय महांगडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी आनंदराव पाटील, राजेंद्र गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम अधिकारी डॉ. अंबादास सकट व डॉ. संग्राम थोरात यांनी कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले.
मा वाळुंज म्हणाले, सध्याच्या काळात गुन्हेगारीची संकल्पना बदलत आहे. सायबर गुन्हेगारी. व्हाईट कॉलर गुन्हेगारी, अल्पवयीन बालकांकडून गुन्हे करून घेणे, बालिकांचे लैंगिक शोषण असे प्रकार वाढत आहेत. या जंजाळातून वाचण्यासाठी विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहावे. सदाचाराने वागण्यासाठी जिद्द लागते. आपल्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांची शहानिशा करून मित्रांची निवड करावी व अभ्यासावर लक्ष केंद्रित करून स्वतःचा विकास साधावा. भाषणानंतर त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तर दिली.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात दत्तात्रय महांगडे म्हणाले, एन.एस.एसच्या स्वयंसेवकांनी गावची स्वच्छता करून स्वच्छतेचे महत्व आचारनातून पटवून दिले आहे. कॉलेजमध्ये शिकणारी मुले काम करतात हे पाहून आम्हालाही आश्चर्य वाटते. विद्यार्थ्यांनी अभ्यास करून स्वतःचे व कुटुंबाचे नाव उज्वल करावे अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
एन.एस.एसचे सल्लागार डॉ. चंद्रकांत कांबळे व स्वयंसेविका राणी राम यांनी मनोगत व्यक्त केले.श्रावणी बगाडे हिने प्रास्ताविक केले, श्रेया दाभाडे हिने पाहुण्यांचा परिचय करून दिला. संचिता मोरे यांनी सूत्रसंचालन तर कीर्ती पिसाळ हिने आभार मानले. कार्यक्रमास पूजा जायगुडे, राजेश्री कांबळे, यादवआबा महांगडे व एन.एस.एसचे स्वयंसेवक यांची उपस्थिती होती
स्थानिक बातम्या
बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी
- Fri 20th Jan 2023 01:50 pm
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Fri 20th Jan 2023 01:50 pm
सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत
- Fri 20th Jan 2023 01:50 pm
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी जानकर आणि एस.डि.पी.ओ. सावंत यांचे खुद्द पोलिस अधीक्षकांना चॅलेंज?
- Fri 20th Jan 2023 01:50 pm
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?
- Fri 20th Jan 2023 01:50 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 20th Jan 2023 01:50 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 20th Jan 2023 01:50 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Fri 20th Jan 2023 01:50 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Fri 20th Jan 2023 01:50 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Fri 20th Jan 2023 01:50 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Fri 20th Jan 2023 01:50 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Fri 20th Jan 2023 01:50 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Fri 20th Jan 2023 01:50 pm













