अंधश्रद्धेपोटी मृतदेहाचे अवशेष चारही दिशांना टाकून दाखविला नैवेद्य ?
Satara News Team
- Mon 20th Jan 2025 04:58 pm
- बातमी शेयर करा

फलटण : विडणी येथील पंचवीस फाटा येथे महिलेचा अंधश्रद्धेतून शुक्रवारी खून झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांच्या तपासात रोज नवनवे खुलासे होऊ लागले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी महिलेचे अवयव शोधण्याचे काम सुरू असून, रविवारी एका ठिकाणी शेतात महिलेचे हात पोलिसांना आढळून आले. चारही दिशांना मृतदेहाचे तुकडे टाकून नैवेद्याचा नरबळी दिल्याचा पोलिसांना संशय आहे.
उसाच्या शेताजवळ महिलेच्या कंबरेखालील अर्धवट मृतदेह आढळून आला होता. त्या परिसरात पूजेचे साहित्यही पडलेले होते. त्यामुळे हा प्रकार अंधश्रद्धेतून घडल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मृतदेहाचा उर्वरित भाग शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. वरील भाग शोधण्यासाठी परिसरातील १५ ते १६ एकरांतील ऊस तोडण्याचे काम सुरू आहे. यासाठी पाचशे मीटर परिसरात ऊसतोड कामगार, शेत मालकांशिवाय इतरांना प्रवेश बंदी केली आहे, तसेच कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
घटनास्थळी तीन दिवसांपासून पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्यासह पोलिस उपअधीक्षक राहुल धस, पोलिस निरीक्षक सुनील महाडीक घटनास्थळी ठाण मांडून आहेत. रात्रंदिवस तपासासाठी पोलिसांची फौज कामाला लाऊन घटनास्थळी छावणी उभारली आहे. घटनास्थळी अनेक पथके पाचारण करून तपासणी केली जात आहे.
घटनास्थळी परिसरात दहा एकर ऊसतोड करून परिसर मोकळा केला. श्वानाद्वारे तपासणी केली, परंतु अवयव काही मिळून आले नाहीत. विडणी गावात व घटनास्थळ परिसरात लोकांची पोलिस चौकशी करीत आहेत. या दृष्टीने तपासणी सुरू आहे. घटनेसंदर्भात पोलिसांनी तपास अत्यंत गोपनीय ठेवला आहे.
#phaltanvidni
स्थानिक बातम्या
कारागृहातून सुटलेल्या संशयिताला नेताना जमावाची गुंडागर्दी
- Mon 20th Jan 2025 04:58 pm
अवैध गुटखा विकणारांवर छापासत्र उंब्रज पोलीस, अन्न, औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई
- Mon 20th Jan 2025 04:58 pm
संजीवराजेंच्या घरी आयकर विभागाचे पथक; चौकशी चालू
- Mon 20th Jan 2025 04:58 pm
ऑनलाईन गेम मध्ये पैसे हरल्याने मोटर सायकल चोरी करणारा वडूज पोलीसांकडून जेरबंद.
- Mon 20th Jan 2025 04:58 pm
"असे" पालकमंत्री मिळणे सातारा जिल्ह्यासाठी दुर्दैवी..
- Mon 20th Jan 2025 04:58 pm
समाजातील लोकांनी दातृत्वाची भावना ठेवायला हवी : दत्तात्रेय इंगवले
- Mon 20th Jan 2025 04:58 pm
संबंधित बातम्या
-
कारागृहातून सुटलेल्या संशयिताला नेताना जमावाची गुंडागर्दी
- Mon 20th Jan 2025 04:58 pm
-
अवैध गुटखा विकणारांवर छापासत्र उंब्रज पोलीस, अन्न, औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई
- Mon 20th Jan 2025 04:58 pm
-
ऑनलाईन गेम मध्ये पैसे हरल्याने मोटर सायकल चोरी करणारा वडूज पोलीसांकडून जेरबंद.
- Mon 20th Jan 2025 04:58 pm
-
शाहूपुरी पोलीस ठाणे म्हणजे अवैध धंदेवाल्यांचे माहेरघरच!
- Mon 20th Jan 2025 04:58 pm
-
'ड्राय डे' दिवशी पोलिसांनी खाकीचीच लक्तरे वेशीवर टांगली
- Mon 20th Jan 2025 04:58 pm
-
तीन गुन्हेगार दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार
- Mon 20th Jan 2025 04:58 pm
-
सातार्यात चिमुरडीवर अत्याचार : पोक्सो अंतर्गत शाहुपूरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Mon 20th Jan 2025 04:58 pm
-
संजय शेलार खून प्रकरणात एकूण ५ आरोपी ताब्यात
- Mon 20th Jan 2025 04:58 pm