फलटण तालुक्यातील विडणी गावाच्या शिवारात एका महिलेचा अर्धवट अवस्थेतला मृतदेह आढळला

अंधश्रद्धेतून महिलेची हत्या

सातारा :  जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील विडणी या गावच्या शिवारात शुक्रवारी दी. .17जानेवारी सकाळी 11 वाजता या धक्कादायक घटनेचा उलगडा झाला. ही घटना अंधश्रद्धेतून महिलेची हत्या करून झाली आहे. असे प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे. विडणी आणि राजाळे गावच्या सरहदिलगत 25 फाटा नावाच्या शिवारात प्रदीप जाधव यांच्या मालकीच्या उसाच्या शेतात हा अर्धवट मृतदेह आढळून आला आहे. हिस्त्र प्राण्यांनी हा मृतदेह कमरेपासून सडलेल्या भाग उसाच्या शेतातून बाहेर ओढून आणला गेला असावा. असे दिसून येत आहे. विडणी गावच्या पोलीस पाटील शीतल नेरकर यांनी या घटनेची माहिती फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला दिल्यानंतर पोलीस उपाधीक्षक वैशाली कडू कर, उपविभागीय अधिकारी राहुल धस, ग्रामीण पोलीस स्टेशनचे शिवाजी जायपत्रे, शिवानी नागवडे यांनी घटनास्थळी येऊन परिसरातील उसाच्या शेताची पाहणी केली. या पाहणीत त्यांना हा मूत्र मृतदेह आढळून आला तर त्या उसाच्या शेतात काही अंतरावरच नारळ ,गुलाल, महिलेचे कापलेले केस, तेलाचा दिवा, काळी बाहूली ,सुरी, आढळून आलीआहे. या घटनेमुळे विडणी गावच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे नागरिकांच्या वतीने वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत पण नक्की घटना काय आहे याबाबत अजून काहीही खुलासा झालेला नाही. फलटण ग्रामीण पोलीस ठाणे आणि शहर पोलीस ठाणे यांचे वतीने वरील वर्णनाच्या वस्तूवरून अनोळखी मृतदेहाची ओळख पटल्यास, किंवा कोणी महिला हरवली असल्यास त्यांच्या नातेवाईकांना ही माहिती देऊन त्याबाबत खालील मोबाईल नंबर वर तात्काळ संपर्क साधावा संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे . फलटण ग्रामीण पोलीस ठाणे

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त