जलसागरचा 'मासा' गळातून निसटला कि सोडला?; अंधारी ग्रामस्थांच्या संशयावरुन चर्चेला उधाण

पोलीस तपासाबाबत ग्रामस्थ नाराज

सातारा : राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख खून प्रकरणात वाल्मिक कराड सारख्या बड्या धेंडयाला बेड्या ठोकत मोक्का लावल्यानंतर पोलीस यंत्रणेवर लोकांनी विश्वास दाखवला असताना साताऱ्यातील अंधारी येथील संजय शेलार खूनप्रकरणात शेलार कुटुंबियांसह ग्रामस्थांनी पोलीस तपासावर संशय व्यक्त केला आहे. संजय शेलार यांचा खून होऊन १५ दिवस उलटले तरी अद्याप मारेकऱ्यापर्यंत पोहचण्यात पोलिसांना यश आले नाही. 

शेलार यांचा खून झाल्याचे उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी मेढा पोलीस ठाण्यात धाव घेत शेलार यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी केली होती. संजय शेलार यांच्या वडिलांनी पोलिसांसमोर अरुण कापसे यानेच माझ्या मुलाला मारले असल्याचा संशय व्यक्त केल्यानंतर या प्रकरणात संयुक्तरित्या तपास करत असलेल्या मेढा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने अखेर काल जलसागरचा मालक अरुण कापसेला ताब्यात घेतले. मात्र चार तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आल्यानंतर केवळ २ तासांत सबळ पुराव्याअभावी अरुण कापसेला जामीन ही मिळाला. त्यामुळे पोलीस तपासावर नाराज झालेल्या ग्रामस्थांनी थेट आता पोलीस तपासावरच संशय व्यक्त केला आहे. आज स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना भेटून ग्रामस्थांनी आपली नाराजी ही व्यक्त केली. १५ दिवसांपासून संथ गतीने चाललेल्या तपासाने आम्हाला नक्की न्याय कधी मिळणार असा सवाल आता ग्रामस्थ करत आहेत. 

 मृत संजय शेलार आणि त्याची पत्नी ही अरुण कापसे यांच्या हॉटेलमध्ये काम करत होते. या दरम्यान अनैतिक संबंधातून अरुण कापसे याने संजय शेलार यांना मारहाण ही केली होती व याच अनैतिक संबंधातून अरुण कापसे याने संजय शेलार यांचा खून केला असून अरुण कापसेला पोलीस प्रशासन पाठीशी घालत असल्याचा आरोप ही ग्रामस्थांनी केला आहे. हत्येचा आरोप असलेल्या गंभीर गुन्ह्यात अरुण कापसेला २ तासांतच जमीन मंजूर झाल्याने संशय आणखीच बळावला असल्याचे ग्रामस्थांनी बोलून दाखवले.


आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त