कण्हेर धरणालगतचा 'तो' मासा पोलिसांच्या गळाला; अरुण कापसेला खून प्रकरणात अटक
संजय शेलार खून प्रकरणी 'जलसागर'चा मालक अरुण कापसे पोलिसांच्या ताब्यातSatara News Team
- Wed 15th Jan 2025 08:57 pm
- बातमी शेयर करा

सातारा : फळणी, ता.जावली येथील संजय गणपत शेलार (वय 32) यांच्या खून प्रकरणी अरुण कापसे यांना गुरुवारी सांयकाळी अटक करण्यात आली. 15 दिवसांपूर्वी मेढा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, संजय शेलार यांना मारहाण झाल्यानंतर सकाळी त्यांचा मृतदेह अंधारी गावच्या हद्दीत आढळून आला. मेढा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असता मारहाणीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. यामुळे शेलार यांना मारणारे मारेकरी कोण? असा सवाल यानंतर उपस्थित झाला. मेढा, वाई पोलीस तपास करत असताना त्यांना यश येत नव्हते.
यामुळे फळणीचे ग्रामस्थ व शेलार कुटुंबिय आक्रमक झाले होते. मारेकर्यांचा तात्काळ शोध घ्यावा, यासाठी निवेदनेही देण्यात आली होती. यावेळी ग्रामस्थांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत संजय शेलार यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी केली होती. शेलार यांचा मारेकरी हा राजकीय वरदहस्ताने मोकाट असून पोलीस जाणीवपूर्वक अटक करण्यास विलंब करत असल्याचा आरोप ही ग्रामस्थांनी केला होता.
दरम्यान, संजय शेलार खून प्रकरणी पोलिसांचा प्राथमिक तपास सुरु असताना गुरुवारी सकाळी ‘जलसागर’चे अरुण कापसे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सुमारे 4 तास चौकशी केल्यानंतर सांयकाळी त्यांना अटक केली. अरुण कापसे यांच्या अटकेनंतर कण्हेर धरणातला 'तो' मासा अखेर पोलिसांच्या गळाला लागलाच अशी चर्चा सुरु आहे.
murdercase
crime
satarapolice
स्थानिक बातम्या
कारागृहातून सुटलेल्या संशयिताला नेताना जमावाची गुंडागर्दी
- Wed 15th Jan 2025 08:57 pm
अवैध गुटखा विकणारांवर छापासत्र उंब्रज पोलीस, अन्न, औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई
- Wed 15th Jan 2025 08:57 pm
संजीवराजेंच्या घरी आयकर विभागाचे पथक; चौकशी चालू
- Wed 15th Jan 2025 08:57 pm
ऑनलाईन गेम मध्ये पैसे हरल्याने मोटर सायकल चोरी करणारा वडूज पोलीसांकडून जेरबंद.
- Wed 15th Jan 2025 08:57 pm
"असे" पालकमंत्री मिळणे सातारा जिल्ह्यासाठी दुर्दैवी..
- Wed 15th Jan 2025 08:57 pm
समाजातील लोकांनी दातृत्वाची भावना ठेवायला हवी : दत्तात्रेय इंगवले
- Wed 15th Jan 2025 08:57 pm
संबंधित बातम्या
-
कारागृहातून सुटलेल्या संशयिताला नेताना जमावाची गुंडागर्दी
- Wed 15th Jan 2025 08:57 pm
-
अवैध गुटखा विकणारांवर छापासत्र उंब्रज पोलीस, अन्न, औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई
- Wed 15th Jan 2025 08:57 pm
-
ऑनलाईन गेम मध्ये पैसे हरल्याने मोटर सायकल चोरी करणारा वडूज पोलीसांकडून जेरबंद.
- Wed 15th Jan 2025 08:57 pm
-
शाहूपुरी पोलीस ठाणे म्हणजे अवैध धंदेवाल्यांचे माहेरघरच!
- Wed 15th Jan 2025 08:57 pm
-
'ड्राय डे' दिवशी पोलिसांनी खाकीचीच लक्तरे वेशीवर टांगली
- Wed 15th Jan 2025 08:57 pm
-
तीन गुन्हेगार दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार
- Wed 15th Jan 2025 08:57 pm
-
सातार्यात चिमुरडीवर अत्याचार : पोक्सो अंतर्गत शाहुपूरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Wed 15th Jan 2025 08:57 pm
-
संजय शेलार खून प्रकरणात एकूण ५ आरोपी ताब्यात
- Wed 15th Jan 2025 08:57 pm