अंधारी खूनप्रकरणी पैलवानाला अटक
आज कोर्टात हजर करणार; एलसीबीची कारवाईSatara News Team
- Fri 17th Jan 2025 09:15 am
- बातमी शेयर करा
सातारा : अंधारी (ता. जावली) येथील संजय गणपत शेलार (वय ३२) यांच्या खून प्रकरणी रामचंद्र तुकाराम दुबळे (३८, रा. सैदापूर, ता. सातारा) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली. संशयित दुबळे हा पैलवान असून त्याने खून केल्याची कबुली दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, संजय शेलार यांना मारहाण झाल्यानंतर दि. २ जानेवारी रोजी सकाळी त्यांचा मृतदेह अंधारी गावच्या हद्दीत आढळून आला. मेढा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असता मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले. यामुळे मारेकरी कोण? असा सवाल उपस्थित झाला. मेढा, पोलिस तपास करत असताना त्यांना यश येत नव्हते. यामुळे फळणीचे ग्रामस्थ व शेलार कुटुंबिय आक्रमक झाले होते. मारेकऱ्यांचा तत्काळ शोध घ्यावा, यासाठी निवेदनेही दिली. खूनप्रकरणी पोलिसांचा प्राथमिक तपास सुरू असताना अनेकांकडे चौकशी केली. शेलार कुटुंबिय तसेच ग्रामस्थांनी जे आरोप केले त्यानुसारही पोलिसांनी तपास केला. मात्र गेले १५ दिवस पोलिसांच्या हाती धागेदोरे मिळत नव्हते. बुधवारी या प्रकरणात अरुण कापसे यांना अटक करण्यात आली होती. मात्र, सुनावणीनंतर न्यायालयाने त्यांची जामीनावर मुक्तता केली होती.
अखेर गुरुवारी या प्रकरणातील मारेकऱ्याला पोलिसांनी पकडले. संशयित रामचंद्र दुबळे याला दुसऱ्या जिल्ह्यात पकडल्यानंतर रात्री उशीरा साताऱ्यात आणण्यात आले. पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली आहे. पोलिस कोठडीसाठी न्यायालयात हजर | केल्यानंतर पोलिस त्याच्याकडे अधिक चौकशी करणार आहेत. यामुळे खुनाचे नेमके कारण काय? मारहाणीसाठी कोणत्या हत्याराचा वापर केला? हल्ला | केल्यानंतर संशयित कुठे गेला? त्याला अन्य आणखी कोणी मदत केली? याचा संपूर्ण तपास पोलिस करणार आहेत.
satara
crime
lcbsatara
स्थानिक बातम्या
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Fri 17th Jan 2025 09:15 am
माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे : प्रकाश शिंदे : आमच्या कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न
- Fri 17th Jan 2025 09:15 am
न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात
- Fri 17th Jan 2025 09:15 am
सातारा नगरपालिका निवडणुक : ५१ सराईत गुन्हेगार हद्दपार
- Fri 17th Jan 2025 09:15 am
दोन्ही राजेंविरोधात जनतेची नाराजी : शरद काटकर
- Fri 17th Jan 2025 09:15 am
शिक्षण प्रसारक संस्थेतील विद्यार्थी अध्ययनासाठी करणार टॅबचा वापर
- Fri 17th Jan 2025 09:15 am
संबंधित बातम्या
-
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीतील अवैध धंद्याबाबत पोलिस पाटलांची कामगिरी संशयास्पद.
- Fri 17th Jan 2025 09:15 am
-
औंधमध्ये गुपचूप वाढणारे अवैध धंदे — प्रशासन आणि प्रस्थापितांचा मौन का?
- Fri 17th Jan 2025 09:15 am
-
सातारा नगरपालिका निवडणुक : ५१ सराईत गुन्हेगार हद्दपार
- Fri 17th Jan 2025 09:15 am
-
राजाचे कुर्ल्यातील युवकास आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सावकारावर गुन्हा दाखल.
- Fri 17th Jan 2025 09:15 am
-
वडुज पोलीस ठाणे हद्दीतुन नागरिकांचे गहाळ झालेले सुमारे साडेचार लाख रुपये किंमतीचे एकुण २४ मोबाईल हस्तगत
- Fri 17th Jan 2025 09:15 am
-
निवृत्त शिक्षकाच्या प्रकरणात साताऱ्यात वरिष्ठ सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
- Fri 17th Jan 2025 09:15 am
-
युवतीला लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार; करंजे येथील युवकावर गुन्हा दाखल
- Fri 17th Jan 2025 09:15 am
-
ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात अवैध धंद्यांचा 'ग्रामीण विकास'
- Fri 17th Jan 2025 09:15 am












