तारळी प्रकल्पग्रस्त मारुती जाधव यांचा प्रजासत्ताक दिनी उपोषणाचा इशारा

सातारा : ग्रामपंचायत आदर्शनगर ता.कराड येथील काही राजकारणी मंडळी जाणीवपूर्वक त्रास देत असून घर बांधकामास अडथळा करत असल्याच्या आरोप करत त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा प्रजासत्ताकदिनी उपोषणास बसण्याचा इशारा प्रकल्पग्रस्त शेतकरी मारुती पांडुरंग जाधव यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. 

 त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, ग्रामपंचायत आदर्शनगर, (डुदेवाडी,), शिरगाव, ता. कराड या ठिकाणी तारळी गावच्या लोकांचे पुनर्वसन करून त्या ठिकाणी घर जागा दिलेली होती. अशाच प्रकारे, प्रकल्पग्रस्त शेतकरी मारुती पांडुरंग जाधव यांना घर जागा आदर्श नगर, ता. कराड या ठिकाणी दिलेली आहे, सदरची जागा मोजून मापून कब्जात दिलेली होती व आहे, या जागेत कंपाउंड देखील केलेले आहे, मात्र आदर्श नगर ग्रामपंचायतचे येथील उपसरपंच व सरपंच व त्यांचे पती भाऊसाहेब निकम व काही राजकारणी मुद्दामून त्रास देत आहेत. हेतूपूर्वक घर बांधून देत नसल्याची तक्रार, प्रकल्पग्रस्त मारुती पांडुरंग जाधव यांची आहे, सदर बाबतीत मला तात्काळ परवाना मिळून घर बांधकामास तसा परवाना मिळावा, दोषीविरुद्ध कारवाई व्हावी अशी मागणी मारुती जाधव यांची असून, याबाबतीत मारुती जाधव यांनी वेळोवेळी शासन, प्रशासनास कळवलेले आहे, ग्रामपंचायत सदस्य व राजकीय पुढारी खूप मोठ्या प्रमाणात त्रास देत आहेत," कायद्याने कोणासही 'अन्न, वस्त्र, निवारा, पाण्यापासून वंचित ठेवता येत नसताना देखील मला का वंचित ठेवले जात आहे? मला का? घर बांधून दिले जात नाही अशी तक्रार जाधव यांची आहे " अशी तक्रार जाधव यांची असून आपणास तात्काळ न्याय न मिळाल्यास आपण भारतीय प्रजासत्ताक दिन २६, जानेवारी २०२५ रोजी पासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालय समोरच कुटुंबिया सहित उपोषणास बसणार असल्याचा इशारा मारुती पांडुरंग जाधव रा. मुरुड,ता. पाटण, जि. सातारा यांनी दिलेला आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त