नागठाणे कॉलेजमध्ये इतिहास कट्टा उपक्रमांतर्गत प्रकट मुलाखतीचे आयोजन

देशमुखनगर : मतिमंद आहेत म्हणून त्यांना समाजातून वगळू  नका तर त्यांना सामाजिक आणि मानसिक आधार देणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन नागठाणे येथील आर्टस् ॲण्ड कॉमर्स कॉलेजमध्ये इतिहास विभागाच्या वतीने आयोजित इतिहास कट्टा उपक्रमांतर्गत महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी व एहसास मतिमंद मुलांचे बालगृह वळसे येथील अधीक्षिका मा.रजनी कांबळे यांनी केले.
त्यापुढे म्हणाल्या की, मतिमंद मुलांना शिक्षणाबरोबर आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रयत्न केले जातात.त्यांच्या वेळच्यावेळी अडी-अडचणी समजून घेऊ त्यांना योग्य ते सहकार्य केले तर त्यांचे आयुष्य सुंदर बनवता येऊ शकते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अजितकुमार जाधव यांनी आपल्या प्रास्ताविक व अध्यक्षीय  भाषणात  म्हणाले की,इतिहास कट्टा उपक्रमांतर्गत आयोजित केलेल्या मुलाखतीमुळे ती व्यक्ती व त्यांच्या कार्याची ओळख होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यातून निश्चितच प्रेरणा मिळत असते. समाजाच्या जडणघडणीत अमूल्य योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा परिचय हा इतिहास कट्टा उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचा दिसून येतो. 
महाविद्यालयातील इतिहास विभागातील विद्यार्थिनी कु.साक्षी साळुंखे, कु.शामल निकम या विद्यार्थिनींनी ही मुलाखत यशस्वीपणे पाडण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रा.जयसिंग राठोड यांनी मांडले तर सूत्रसंचालन प्रा.राहुल गंगावणे यांनी केले कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी- विद्यार्थिनी उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला