आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा येत्या मंगळवारी पाटणमध्ये!, शंभूराज देसाईंवर तोफ डागणार?
सागर पाटील
- Sun 31st Jul 2022 08:22 am
- बातमी शेयर करा
पाटण : एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षात फूट पडली. यानंतर आता युवानेते आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र पिंजून काढायला सुरूवात केली आहे. निष्ठा यात्रेच्या माध्यमातून बंडखोर आमदारांच्या मतदार संघात जावून कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम ते करीत आहेत. येत्या मंगळवारी दि. २ ऑगस्टला आदित्य ठाकरे माजी गृहराज्यमंत्री व बंडखोर आमदार शंभूराज देसाई यांच्या पाटण मतदार संघात येणार आहेत. यावेळी ते काय तोफ डागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० शिवसेना आमदारांनी बंडखोरी केली. यामध्ये सातारा जिल्ह्यातील दोन आमदार असल्याने ते दौर्यावर येत आहेत. आमदार शंभूराज देसाई हे पाटण मतदार संघातून तर आमदार महेश शिंदे हे कोरेगाव मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे आदित्य ठाकरे या दोघांवर काय तोफ डागणार हे पहावे लागेल.निष्ठा यात्रेचा दुसरा टप्पा १ व २ ऑगस्टला सिंधुदुर्ग, कोल्हापुर, पाटण, सातारा, पुणे असा असणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई, ठाणे, औरंगाबाद, पैठण, शिर्डी अशी यात्रा केल्यानंतर आदित्य ठाकरे एक ऑगस्टला सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि पुण्यात यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याकरीता दौऱ्यावर जाणार आहेत अशी माहिती मिळते. मंगळवारी दुपारी २ वाजता पाटण येथे निष्ठा यात्रा येणार आहे. तेथून ते पुढे पुण्याकडे रवाना होणार आहेत.
पाटण मतदार संघात आमदार शंभूराज देसाई यांच्या बालेकिल्यात आदित्य ठाकरे येणार आहेत. निसरे फाटा येथे निष्ठा यात्रेचे स्वागत करण्यात येणार असून तेथून मल्हारपेठ पर्यंत रॅली काढण्यात येणार आहे. तेथे आमचे नेते आदित्य ठाकरे निष्ठा यात्रेच्या माध्यमातून शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. तेथून ते उंब्रज मार्गे पुण्याकडे रवाना होतील . - हर्षद कदम, जिल्हाप्रमुख
aatdiaythakare
shamburajdesai
स्थानिक बातम्या
डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात
- Sun 31st Jul 2022 08:22 am
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Sun 31st Jul 2022 08:22 am
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Sun 31st Jul 2022 08:22 am
बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी
- Sun 31st Jul 2022 08:22 am
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Sun 31st Jul 2022 08:22 am
संबंधित बातम्या
-
डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात
- Sun 31st Jul 2022 08:22 am
-
पुणे पदवीधर निवडणुकीत महायुतीची ताकद वाढली; शरद लाड, भैय्या माने डॉ. स्मिता जाधव यांच्या प्रचारात सक्रिय
- Sun 31st Jul 2022 08:22 am
-
मतदारसंघ पुनर्रचना अजून झालीच नाही; मग शशिकांत शिंदेंची मुंबईत ‘राजकीय मोर्चेबांधणी’ कशासाठी?
- Sun 31st Jul 2022 08:22 am
-
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Sun 31st Jul 2022 08:22 am
-
कदमांना “ससा” म्हणत सपकाळांनी टोला मारला; पण आंबेघरचा पराभव आठवताच सोशल मीडियाने सपकाळांनाच घेरले!
- Sun 31st Jul 2022 08:22 am
-
स्वातंत्र्यदिनी महाबळेश्वरच्या स्वच्छता व पाणीपुरवठ्याला नवी ताकद!
- Sun 31st Jul 2022 08:22 am
-
आखाडे ठरावाचा राग अनावर; राजे गटाच्या कार्यकर्त्यावर हल्ला, मेढा पोलीस ठाण्यात राजकीय नेत्यांची गर्दी!
- Sun 31st Jul 2022 08:22 am












