सातारा जिल्हा कारागृहात ‘किऑस्क’ सिस्टीमचे उद्घाटन

सातारा : जिल्हा कारागृहातील बंदींना त्यांची गुन्ह्यांबाबतची सर्वतोपरी माहिती मिळण्यासाठी “किऑस्क सिस्टीम” कारागृहात कार्यान्वित करण्यात आलेली आहे. सदर किऑस्क सिस्टीमचे उद्घाटन सातारा जिल्हा न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश श्रीमती कमला बोरा यांच्या हस्ते करण्यात आले.

किऑस्क सिस्टीमद्वारे बंदींना ते कारागृहात कोणत्या गुन्ह्यात आले, त्यांना अटक केव्हा झाली, कारागृहात दाखल केव्हा झाले, त्यांच्यावर कोणत्या पोलीस स्टेशनचा गुन्हा आहे, कोणत्या पोलीस स्टेशनचे किती गुन्हे त्यांच्यावर आहेत, त्यांच्याजवळ त्यांच्या अकाउंटला खाजगी रक्कम किती आहे, किती खर्च झाला, न्यायालयाची मागील कोर्ट पेशीची तारीख काय होती तसेच न्यायालयाची पुढील कोर्ट पेशीची तारीख काय असेल याबाबतची सर्व माहिती बंदींना एका क्लिकवर मिळणार आहे.

उद्घाटन प्रसंगी जिल्हा न्यायाधीश श्रीमती कमला बोरा म्हणाल्या, कारागृह प्रशासनाने बंदिंसाठी अशी यंत्रणा उभी करून खूपच चांगली सुविधा निर्माण करून दिली आहे. यामुळे बंदींना त्यांच्या बाबतची सर्वतोपरी माहिती त्यांना मिळण्यास मदत होणार आहे.

कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे यांनी सांगितले की, किऑस्क सिस्टीमद्वारे कारागृहातील सर्वच बंदी त्यांच्या गुन्ह्यांचे स्टेटस यामध्ये पाहू शकतात. त्याचबरोबर त्यांचे पैसे, नातेवाईक भेटी, वकील भेटी, गुन्ह्यांच्या तपशील इत्यादी सर्वच बाबी ते पाहू शकतात. त्यामुळे सदरची माहिती घेण्यासाठी कारागृहात यापूर्वी होत असलेल्या माहिती अधिकाराच्या अर्जांची संख्या कमी होण्यास निश्चितपणे मदत होईल. सदरची माहिती ही प्रत्येक बंद्याला त्याच्या स्वतःचा “थम इम्प्रेशन” देऊन स्वतः घेता येत असल्यामुळे त्याला आता न्यायालयीन प्रक्रिया संबंधितची माहिती घेण्यासाठी कोणताही अर्ज किंवा माहिती अधिकाराचा अर्ज करण्याची आवश्यकता पडणार नाही.

कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीशकमला बोरा, कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे, वरीष्ठ तुरुंगाधिकारी राजेंद्र भापकर, वरिष्ठ लिपिक हेमंत यादव, नानासो डोंगळे, हवालदार येळे, शिपाई राकेश पवार, चेतन शहाणे, चांद पटेल, प्रभाकर माळी, प्रतीक्षा मोरे, रूपाली नलवडे, अंकिता करपे, अमीर शेख उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला