साताऱ्यामध्ये नवीन १०० खाटांचे रुग्णालय सुरु करण्यास मंजूरी
केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या अखत्यारितील ईएसआय कार्पोरेशन मार्फत मंजूरीप्रतिनिधी - ओम सोनावले
- Thu 23rd Jun 2022 09:01 am
- बातमी शेयर करा
सातारा जिल्ह्यात कामगारांची संख्या मोठी आहे. तसेच ईएसआय योजना लागू असेलेले कामगार सुध्दा काही लाखात आहेत. त्या सर्व कामगारांना या रुग्णालयाचा मोठा आधार लाभणार आहे. लवकरच मिल्ट्री हॉस्पिटल देखिल सुरु होण्यासाठी आमचा अखंड पाठपुरावा सुरू आहे.
सातारा : केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या अखत्यारितील ईएसआय कार्पोरेशन मार्फत साताऱ्यामध्ये नवीन १०० खाटांचे रुग्णालय सुरु करण्यास मंजूरी मिळाली आहे.
ईएसआय कार्पोरेशनच्या तर्फे याबाबतची अधिकृत घोषण केंद्रीय कामगारमंत्री ना. भुपेंद्रसिंह यादव यांनी केली आहे. साताऱ्यात सैनिक हॉस्पिटल आणि ईएसआय हॉस्पिटल उभारणीबाबत आमचा सातत्याने पाठपुरावा चालु आहे त्यापैकी १०० खाटांचे ईएसआय चे हॉस्पिटल करीता मंजूरी मिळाल्याने, याचा लाभ जिल्हयातील ईएसआय योजना लागु असणा-या लाखो कामगारांना होणार आहे.
सक्षम सार्वजनिक आरोग्य सुविधा ही आज काळाची गरज बनली आहे कोरोना काळात राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवकांनी अतिशय चांगले कार्य केले आहे. सार्वजनिक आरोग्य यंत्रणांवर ताण येवू नये म्हणून अधिकाधिक सार्वजनिक सुविधा विविध माध्यमातुन सुरु करण्यासाठी आम्ही सैनिक हॉस्पिटल आणि ईएसआय हॉस्पिटिल स्वतंत्रपणे सुरु करणेबाबत केंद्रशासनाकडे प्रस्तावित केलेले आहे.
त्याचा सातत्याने आमच्याकडून पाठपुरावा देखिल सुरु आहे. केंद्र शासनाच्या कामगार खात्याच्या अखत्यारित येणाऱ्या ईएसआय कॉर्पोरेशन महाराष्ट्रात सहा ठिकाणी १०० खाटांचे रुग्णालय सुरु करण्याबाबत धोरण आखले असून, त्या धोरणानुसार महाराष्ट्रात पालघर, सातारा, पेण, जळगांव, चाकण आणि पनवेल या ठिकाणी ईएसआय हॉस्पिटलची उभारणी करण्याचे निश्चित केले आहे. संपूर्ण देशात २३ ठिकाणी अशी हॉस्पिटल्स सुरु करण्यात येणार असून, पैकी सर्वात जास्त महाराष्ट्रात सहा ठिकाणी रुग्णालयांची उभारणी होणार आहे ईएसआय हॉस्पिटलच्या उभारणीकरीता काही जागां आम्ही सूचवलेल्या आहेत, त्यापैकी एका जागेची निश्चिती करण्यात येणार आहे. जागा निश्चिती झाल्यावर या ठिकाणी ईएसआय कॉर्पोरेशन चे १०० खाटांचे रुग्णालयाची उभारणी करण्यात येईल, सातारा जिल्ह्यात कामगारांची संख्या मोठी आहे. तसेच ईएसआय योजना लागू असेलेले कामगार सुध्दा काही लाखात आहेत. त्या सर्व कामगारांना या रुग्णालयाचा मोठा आधार लाभणार आहे. लवकरच मिल्ट्री हॉस्पिटल देखिल सुरु होण्यासाठी आमचा अखंड पाठपुरावा सुरू आहे.
#satara#udyanrajebhosale
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Thu 23rd Jun 2022 09:01 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Thu 23rd Jun 2022 09:01 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Thu 23rd Jun 2022 09:01 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Thu 23rd Jun 2022 09:01 am
संबंधित बातम्या
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Thu 23rd Jun 2022 09:01 am
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Thu 23rd Jun 2022 09:01 am
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Thu 23rd Jun 2022 09:01 am
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Thu 23rd Jun 2022 09:01 am
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Thu 23rd Jun 2022 09:01 am
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Thu 23rd Jun 2022 09:01 am
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Thu 23rd Jun 2022 09:01 am
-
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Thu 23rd Jun 2022 09:01 am












