सोमवार पेठेतील अर्धवट सोडलेल्या बंदिस्त गटारा मुळे येथील नागरिकांच्या आरोग्यास धोका

संबंधित ठेकेदार व नगरपालिका निद्रावस्थेत

सातारा  : सातारा शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून बंदिस्त गटाराचे काम चालू आहे. खरं तर हा स्तुत्य उपक्रम आहे. परंतु याचा फटका सोमवार पेठेतील काही भागांमध्ये बसल्याचा पाहायला मिळत आहे. कारण नगरपालिकेने येतील गटारे खोदली खरी परंतु काम निम्मेच करून पुढे कोठे माशी शिंकली माहित नाही परंतु हे काम निम्म्यातच बंद पटल्याने येथील स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करायला लागत या भागात मोठया प्रमाणात साथीच्या आजाराने त्रस्त  आहेत.  खरं तर सोमवार पेठ हा भाग नेहमी गजबजलेला भाग म्हणून ओळखला जातो कारण येथील न्यू इंग्लिश स्कूल हे शाळा असल्याने शाळेमध्ये मुलांना नेणे आणण्यासाठी बरीच गर्दी या ठिकाणी असते त्याचबरोबर मुख्य बाजारपेठ सुद्धा या परिसरातच असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते परंतु या अर्धवट सोडलेल्या बंदिस्त गटारातून काढलेली दगड माती ही या रस्त्यावर टाकलेली असल्येने याचा फटका वाहनधारकांबरोबरच स्थानिक नागरिकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात बसल्याचा पाहायला मिळत आहे.

अगोदरच हा रस्ता अरुंद आहे त्यात हे नाले उकडून त्याच्याभोवती मोठमोठ्याले दगड टाकून या भागात मोठ्या प्रमाणात अपघात होत आसतात या अपघातावरून वादावादी सुद्धा होत आहे. आणि याचा फटका येथील स्थानिक नागरिकांना बसत आहे या पेठेमध्ये मोठ्या प्रमाणात साथीचे रोग सुद्धा गेल्या दोन महिन्यात पसरु लागले आहेत परंतु याकडे कोणीच लक्ष देत नाही नगरपालिकेचे आधिकाऱयांनी गांधारीची भूमिका घेत डोळ्यावर पट्टी बांधून घेतल्याचे पाहायला मिळत आहे या भागातील हे अर्धवट सोडलेलं काम लवकरात लवकर पूर्ण करावे नाहीतर येथील नागरिक आंदोलनाच्या तयारीत असल्याचं येथील नागरिकांनी सातारा न्यूजला सांगितला आहे. याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्याने घेऊन ज्या ठेकेदाराने काम निम्मे  सोडलेल आहे या ठेकेदारावर कारवाई करून हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला