औंध पोलीसांनी आरोपींच्या मुसक्या आवळुन पावणे तीन लाखांच्या मुद्देमालासह अटक

औंध :  औंध पोलीस ठाणे हद्दीतील मौजे उंचीठाणे ता. खटाव जि.सातारा गावचे हद्दीतील फिर्यादीच्या मळा नावचे शिवारातील शेतातील शेडमध्ये असलेली दोन बोकडं ज्याची अंदाजे किंमत रुपये २७०००/- असावी. हे फिर्यादीचे संमती शिवाय मुद्दाम लबाडीने कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरली असून शिवाय अन्य मजकुरचे खबरी वरुन औंध पोलीस स्टेशन येथे सागर मोहन शिंदे वय ३४ वर्षे, राहणार उंचीठाणे, तालुका खटाव यांनी फिर्याद दिली त्यानुसार गु.र.नं. १५९/२०२३ भा.द. वि.स.कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
            सदर गुन्ह्याचे तपासा बाबत वरिष्ठ अधिकारी यांनी गुन्हा घडलेपासुन वेळोवेळी गुन्हा उघडकीस आणणे बाबत सुचना दिल्या त्याप्रमाणे औंध पोलीस ठाणेचे प्रभारी स.पो.नि. दत्तात्रय दराडे व त्यांचे सहकाऱ्यांनी सदर दाखल गुन्ह्याबाबत घटनास्थळी जावुन बारकाईने माहिती घेवुन तसेच गोपनीय माहितीच्या आधारे व तांत्रिक विश्लेषन करुन सदर आरोपी निष्पन्न करुन. सदर आरोपीस पुसेसावळी ते गोरेगांव वांगी जाणारे रोडवर सापळा रचुन गुन्हयातील चोरीस गेले मुद्देमालासह अवघ्या ३ तासांत 
आरोपी- १) सचिन अशोक न्हावकर वय ३२ वर्षे राहणार उंचीठाणे, तालुका खटाव,
२) अमोल सूर्यकांत यादव वय ३३ वर्षे, राहणार उंचीठाणे, तालुका खटाव अन १ व २ यांना अटक करण्यात आली आहे.
३) सागर बाबासाहेब शिंदे, राहणार उंचीठाणे, तालुका खटाव. आरोपींकडून गुन्हयात वापरलेली ओमणी वाहन (क्रमांक एम.एच.११ वाय ३०८९) किंमत रुपये १,५०,०००/- एक मोटर सायकल(एम.एच.११ डी.जे.८५४४) किंमत रुपये १०,०००/- दोन बोकडं किमत रुपये २७,०००/- असा एकुण २,४७,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
          सदर गुन्ह्याचा तपास श्री.समीर शेख, मा. पोलीस अधीक्षक सो, सातारा, श्री बापु बांगर, मा. अपर पोलीस अधीक्षक, अश्वीनी शेडगे मा. उपविभागीय पोलीस अधि. दहिवडी विभाग कॅम्प वडूज यांचे मार्गदर्शनाखाली औंध पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे, राहुल एस. वाघ पो.हवा, ब.नं.११२९, प्रशांत पी.पाटील,पो.हवा. ब.नं. ५८१, किरण एन. हिरवे, पो. कॉ. ब.नं. ५१०, पी.एस.इंगळे,पो.कॉ. ब.नं. २३० यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधिक्षक सो. सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सो, सातारा यांनी अभिनंदन केले आहे

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन

जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला