मल्हारपेठ जि. प. केंद्र शाळेतील बाल बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

पाटण :   मल्हारपेठ येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणात आठवडा बाजार भरवला. मोठ्या बाजाराप्रमाणेच होणारे व्यवहार लहान वयातच अवगत होण्यासाठी बालबाजार हा उपयोगी पडत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये बाजारांमधील होणारे व्यवहार कळावे मोठ्या बाजारातील ग्राहक व्यापारी व्यवहारात कळावे. या उद्देशाने आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते. या बाजाराला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला यावेळी जवळपास 20 ते 30 हजाराची उलाढाल झाली    
                या बाल बाजाराचे उद्घाटन शाळा समितीच्या अध्यक्षा लक्ष्मी फल्ले केंद्रप्रमुख सुरेश भिसे यांच्या उपस्थितीत झाले.यावेळी साक्षी पवन कुमार मोरे  सरिता उमाकांत पल्ले, अमोल तानाजी जाधव ,योगेश सुभाष सुर्वे पालक ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामीण भागातील या शाळेतील विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी रानातील ताजा भाजीपाला, मोड आलेले कडधान्य, गरम भजी ,खारी, टोस्ट ,बटर, तिळगुळ ,उडीद भेळ, पाणीपुरी अंडी, मासे,चायनीज मंचुरियन पिझ्झा असे विविध प्रकारचे साहित्य विक्रीसाठी आणले होते. या उपक्रमात पालक ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या  कृतिशील उपक्रमात मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन खरेदी केले बालबाजाराला जणू मोठ्या आठवडी बाजारासारखा स्वरूप आले होते. शिक्षक सरिता फुले अमोल जाधव यांनी नियोजन केले होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला