BREAKING : राजेंच्या शब्दाला मान; ७५ जणांची माघार

नगराध्यक्षपदासाठी ५ जणांची माघार; पालिकेत सध्या २ जण बिनविरोध

सातारा : सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत अर्ज माघारी घ्यायच्या शेवटच्या दिवशी तब्बल ७५ उमेदवारांनी आपला मार्ग मागे घेतल्याने अनेकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. काल खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जात असून कोणी नाराज होण्याचे कारण नाही ज्यांना संधी मिळाली नाही त्यांना अन्य माध्यमातून संधी देण्याचे आश्वासन दिले होते. 


   सातारा पालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राजेंच्या आघाड्यांकडून भाजपतर्फे ५० जागांसाठी तब्बल ४०० हुन अधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्या होत्या. (सातारा न्यूज) त्यामुळे पक्षाकडून संधी न मिळालेल्या अनेकांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यातच महाविकास आघाडी रिंगणात उतरल्याने भाजपची धाकधूक वाढली होती. मात्र अर्ज माघार घ्यायच्या अखेच्या दिवशी तब्बल ७५ जणांनी अर्ज माघारी घेतल्याने अनेकांनी थोडा का होईना सुटकेचा निश्वास सोडला. (सातारा न्यूज) मात्र आश्चर्याची बाब म्हणजे जी महाविकास आघाडी या निवडणुकीत ताकदीने उतरली होती. त्याच महाविकास आघाडीतील शरद पवार गटातील तब्बल ४ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने चर्चेचा विषय ठरला. तसेच नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून बाळासाहेब शिंदे यांनी भरलेला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.  उमेदवारीसाठी ठाकरे गटातून शिंदे गटात कोलांटी उडी मारणाऱ्या बाळासाहेब शिंदे यांनी अर्ज माघार घेतल्याने साताऱ्यात चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर नगराध्यक्ष पदासाठी आणखी ४ जणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले. (सातारा न्यूज) तर प्रभाग क्रमांक ११ मधून अपक्ष अर्ज भरणारे वसंत लेवे याची देखील आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. (सातारा न्यूज) तर आशा पंडित आधीच बिनविरोध झाल्यानंतर आज दत्तू धबधबे यांनी आपला अर्ज माघारी घेतल्याने बाळू खंदारे हे देखील बिनविरोध झाले आहेत.


   अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज माघार घेतलेल्यांमध्ये प्रभाग क्रमांक ३ ब भोसले अर्चना गणेश, प्रभाग क्रमांक ३ ब शारदा वसंत जाधव, प्रभाग क्रमांक 19 ब  मनीषा प्रकाश घुले, प्रभाग क्रमांक 15 अनिल शिवाजी अवघडे, प्रभाग क्रमांक 12 बसप्पा बाबुराव कोरे, प्रभाग क्रमांक ३ ब मनस्वी विकास धुमाळ, प्रभाग क्रमांक ५ ब सुनिशा निलेश शहा, प्रभाग क्रमांक 25 ब सोनाली नितीन जांभळे, प्रभाग क्रमांक १ ब संतोष बाळकृष्ण कीर्दत, प्रभाग क्रमांक 12 ब मीना महेश गोंदकर,प्रभाग क्रमांक 15 ब स्वाती श्रीकांत आंबेकर, प्रभाग क्रमांक पाच स्वाती श्रीकांत आंबेकर, प्रभाग क्रमांक पाच ब निशिकांत विठ्ठल मुळे, प्रभाग क्रमांक 18 योगेश बाबुराव जाधव, प्रभाग क्रमांक ६ अमर बळीराम इंदलकर, प्रभाग क्रमांक 13 दत्तू संगाप्पा धबधबे, प्रभाग क्रमांक 17 महेश रघुनाथ चौगुले, प्रभाग क्रमांक 21 किशोर विठ्ठल पंडित, प्रभाग क्रमांक ६ सुनील नारायण भोजने, प्रभाग क्रमांक 18 कल्पना छत्रपती डांगरे, प्रभाग क्रमांक 18 नीता संजय यादव, प्रभाग क्रमांक 22 ब निखिल विजय चव्हाण, प्रभाग क्रमांक दहा ब नंदकुमार शशिकांत काटे, प्रभाग क्रमांक दहा ब नंदकुमार शशिकांत काटे, प्रभाग क्रमांक 19 सीमा अमोल नलावडे, प्रभाग क्रमांक 23 अ अमित अशोक चोरगे, प्रभाग क्रमांक चार रजनी राजू जेधे, प्रभाग क्रमांक सहा पूजा अजय बोराटे, प्रभाग क्रमांक 12 पोपट लक्ष्मण कुंभार, प्रभाग क्रमांक 15 ब पल्लवी अमोल पाटोळे, प्रभाग क्रमांक 9 विद्या ज्ञानेश्वर येडे, प्रभाग क्रमांक 17 अ विजय मल्लिकार्जुन बोबडे, प्रभाग क्रमांक 3 कांचन गणेश घोडके, प्रभाग क्रमांक ९ वंदना राजाराम शेलार, प्रभाग क्रमांक 7 शकीर गुलाबभाई बागवान, प्रभाग क्रमांक ६ ब शशांक प्रभाकर ढेकणे, प्रभाग क्रमांक 1 ब आशिष शंकर खरात, प्रभाग क्रमांक 14 ब अक्षय प्रकाश गवळी, (सातारा न्यूज) प्रभाग क्रमांक 21 व आशा किरण ढगे, प्रभाग क्रमांक 6 ब विजय श्रीमंत शेळके, प्रभाग क्रमांक 6 विशाल प्रल्हाद पवार, प्रभाग क्रमांक 21 अ भारतीय शैलेंद्र दत्तात्रय, प्रभाग क्रमांक 22 ब विशाल दिलीप चव्हाण, प्रभाग क्रमांक 21 अ सिद्धार्थ शशिकांत सुपेकर, प्रभाग क्रमांक 1 अ भिमाबाई शांताराम भोईर, प्रभाग क्रमांक 14 अ जास्मिन इन्तेखाब बागवान, प्रभाग क्रमांक 14 इन्तेखाब अब्दुलरहीम बागवान, प्रभाग क्रमांक ६ संगीता बाळासाहेब भुजबळ, प्रभाग क्रमांक ९ अभिजीत राजेंद्र बारटक्के, प्रभाग क्रमांक 17 ब सुवर्णा तानाजी पाटील, प्रभाग क्रमांक २ ब राबिया आदम बेपारी, प्रभाग क्रमांक १ व पृथ्वीराज संजय ढाणे, प्रभाग क्रमांक 11 ब वसंत बबनराव लेवे, प्रभाग क्रमांक ५ अ सुजाता पांडुरंग राजे, प्रभाग क्रमांक 25 ब रेश्मा गणेश मोरे, (सातारा न्यूज) प्रभाग क्रमांक २ ब रीना तानाजी भणगे, प्रभाग क्रमांक १ ब महेश प्रकाश भोसले, प्रभाग क्रमांक ८ ब रवी राजू माने, प्रभाग क्रमांक 16 शंकर रामचंद्र माळवदे, प्रभाग क्रमांक ७ ब महेश गजानन गोंदकर, प्रभाग क्रमांक ४ ब शंकर रामचंद्र माळवदे, प्रभाग क्रमांक 14 सकीना सोहेल शेख, प्रभाग क्रमांक 21 अ धनंजय गजानन पाटील, प्रभाग क्रमांक 21 ब आलिशा धनंजय पाटील, प्रभाग क्रमांक ६ ब शंकर कृष्णा किर्दत, प्रभाग क्रमांक 14 वनिता सागर साळुंखे, प्रभाग क्रमांक 14 ब नासिर बशीर शेख, प्रभाग क्रमांक 21 ब रुपाली सागर पावसे, प्रभाग क्रमांक २४ वनिता सचिन पवार, प्रभाग क्रमांक 17 ब मेघा अतिश कांबळे यांनी माघार घेतली आहेत.


नगराध्यक्ष पदासाठी माघार घेतलेल्या उमेदवारांची यादी

शंकर रामचंद्र माळवदे, 

शिवाजी नारायण भोसले, 

सुहास एकनाथ मोरे, 

बाळासाहेब पुंडलिक शिंदे, 

अशोक राजाराम मोने

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला