आ. शशिकांत शिंदे यांचे पुतणे सौरभ शिंदे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला जाहीर पाठिंबा
Satara News Team अजित जगताप- Fri 8th Jul 2022 10:58 am
- बातमी शेयर करा
सातारा : दरे ता महाबळेश्वर म्हणजेच सातारा जिल्ह्याचे सुपुत्र व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढता पाठिंबा मिळत आहे. नुकतेच माथाडी कामगार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आ. शशिकांत शिंदे यांचे पुतणे सौरभ ऋषिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी पक्ष बाजूला ठेवून मुख्यमंत्री शिंदे यांना थेट पाठींबा जाहीर केला आहे.
सातारा जिल्ह्याचे सुपुत्र व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाचा कोंडमारा दूर करण्यासाठी मोठ्या धाडसाने दमदार पाऊल उचलले होते. त्यांना सर्वत्र वाढता पाठींबा मिळत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ. शशिकांत शिंदे यांचे पुतणे सौरभ शिंदे यांनी ही नवी मुंबईत राहून सातारी बाणा दाखवून दिला आहे.
घणसोली येथील एका निवासी संकुल बाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी यापूर्वीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यांच्या समवेत बहुतांश रहिवाशी व नवी मुंबई येथील सुमारे ३५ नगरसेवकांनी ही राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने सौरभ शिंदे यांनी भूमिका घेतली आहे.
आदरणीय चुलते आ. शशिकांत शिंदे यांच्या छायेखाली पुतणे सौरभ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातूनच बाळकडू लाभले आहे. वडील व माथाडी कामगार नेते ऋषिकांत शिंदे यांचे ही मार्गदर्शन आहे. आपला माणूस मोठा होत असेल तर त्यांना विरोध करण्यापेक्षा त्यांना पाठींबा दिला पाहिजे. याच भावनेतून सौरभ शिंदे यांनी राजकीय निर्णय घेतला आहे. त्याचा त्यांना निश्चितच फायदा होईल, असे सध्या तरी दिसत आहे.
shashikantshinde
EknathShinde
स्थानिक बातम्या
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Fri 8th Jul 2022 10:58 am
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Fri 8th Jul 2022 10:58 am
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Fri 8th Jul 2022 10:58 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Fri 8th Jul 2022 10:58 am
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Fri 8th Jul 2022 10:58 am
संबंधित बातम्या
-
मतदारसंघ पुनर्रचना अजून झालीच नाही; मग शशिकांत शिंदेंची मुंबईत ‘राजकीय मोर्चेबांधणी’ कशासाठी?
- Fri 8th Jul 2022 10:58 am
-
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Fri 8th Jul 2022 10:58 am
-
कदमांना “ससा” म्हणत सपकाळांनी टोला मारला; पण आंबेघरचा पराभव आठवताच सोशल मीडियाने सपकाळांनाच घेरले!
- Fri 8th Jul 2022 10:58 am
-
स्वातंत्र्यदिनी महाबळेश्वरच्या स्वच्छता व पाणीपुरवठ्याला नवी ताकद!
- Fri 8th Jul 2022 10:58 am
-
आखाडे ठरावाचा राग अनावर; राजे गटाच्या कार्यकर्त्यावर हल्ला, मेढा पोलीस ठाण्यात राजकीय नेत्यांची गर्दी!
- Fri 8th Jul 2022 10:58 am
-
भाजप बैठकीत वादाचा भडका; गोळे–मानकुमरे आमनेसामने, हातगेघर ठरावावरून आरोप-प्रत्यारोप
- Fri 8th Jul 2022 10:58 am
-
हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!
- Fri 8th Jul 2022 10:58 am












