खटाव माण तालुका दुष्काळ जाहीर करण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने कातर खटाव येथे रस्ता रोको आंदोलन
- अजित जगताप
- Sat 22nd Jul 2023 02:28 pm
- बातमी शेयर करा
कातर खटाव :महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाने थैमान घातले आहे . दुसऱ्या बाजूला सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. खटाव माण तालुक्यात पुरेसा पाऊस नसलेले शेतकरी हवालदिल झालेला आहे अशावेळीला दोन्ही तालुके दुष्काळी जाहीर करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रीय सदस्य व युवा नेते रणजीतसिंह देशमुख ,डॉ. महेश गुरव, शेतकरी संघटनेचे नेते अनिल पवार व मान्यवरांच्या उपस्थितीत कातरखटाव ता. खटाव या ठिकाणी सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळेला पोलीस उप अधीक्षक अजय कोकाटे यांच्यासह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
सध्या सर्वत्र पावसाळ्याच्या सरी कोसळत असून अनेक ठिकाणी नदी, नाले, विहिरी, ओढे पावसाच्या पाण्याने तुडूंब भरलेले आहेत. मोठ्या प्रमाणात दरड कोसळून दुर्घटना घडत आहेत. तर दुसऱ्या बाजूला सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भाग म्हणून परिचित असलेल्या खटाव व माण तालुक्यात पाऊस नसल्याने शेतीची पेरणी रखडलेली आहे.
अशा वेळेला शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खटाव माण तालुका दुष्काळ जाहीर करावा. यास उरमोडी उपसा जलसिंचन योजनेचे पाणी त्वरीत सोडावे, खटाव तालुकाच्या पूर्व भागासाठी तारळी योजनेचे पाणी उपलब्ध करून दयावे, खरीप हंगाम वाया गेल्याने त्याची नुकसान भरपाई त्वरीत मिळावी, पिक कर्ज संपूर्णपणे माफ करावे, नियमित कर्ज फेडणा-या शेतक याना प्रोत्साहनपर अनुदान त्वरीत मिळावे, उचाईग्रस्त गावासाठी पिण्याच्या पाण्यासाठी ट्रॅकर बालू करावेत, जनावरासाठी चारा पाण्याची सोय करावी, अशा मागण्यांचे निवेदन कातर खटाव मंडलाधिकारी श्री बाबर यांना देण्यात आले.
या रास्ता रोको आंदोलनासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षासोबत, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना व घटक पक्षाने सहभाग घेतला होता. या मोर्चाला ज्येष्ठ नेते सत्यवान कांबळे, परेश जाधव राजू मुलाणी, सत्यवान कमाने , दत्ता केंगारे,राहुल सजगणे, निलेश घार्गे, बाबासाहेब माने, शिवाजीराव यादव, हणमंत भोसले , संजय पानसकर ,दिंगबर देशमुख,निलेश पोळ, मोहन देशमुख , अमरजीत कांबळे, ॲड. संदीप सजगणे इम्रान बागवान, खटाव महिला तालुकाध्यक्ष सुजाता महाजन, संतोष दुबळे व सूर्यभान जाधव, जयकुमार बागल,दत्तू काका घार्गे ,वैभव पाटील, मुबारक मुल्ला, बाबासाहेब पाटील,अमित चव्हाण , संतोष मांडवे, पोपट मोरे ,शैलेश लोहार, हूमाय तांबोळी ,विक्रम गोडसे, लखन पवार, संभाजी पाटोळे यांच्या समवेत खटाव माण तालुक्यातील शेतकरी वर्ग उपस्थित होते.
या रास्ता रोको आंदोलनानंतर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न केला त्याचे कौतुक होत आहे.
____________
स्थानिक बातम्या
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून घरी परतत असतानाच ग्राम महसूल अधिकारी रोहित कदम यांचा अपघाती मृत्यू
- Sat 22nd Jul 2023 02:28 pm
शेताजवळचा कचरा उचलाय सांगून सुद्धा उचलला नाही म्हणून ग्रामपंचायतीचा ट्रॅक्टर दिला पेटवून
- Sat 22nd Jul 2023 02:28 pm
जिल्ह्यात बारा वाजेपर्यंत मतदान संत गतीनेच
- Sat 22nd Jul 2023 02:28 pm
शरद पवारांनी त्या काळात काँग्रेस फोडली ती गद्दारी नव्हती का ? ...उदयनराजे
- Sat 22nd Jul 2023 02:28 pm
255 फलटण विधानसभा मतदारसंघात शासकीय यंत्रणा सुसज्ज
- Sat 22nd Jul 2023 02:28 pm
पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरूणास अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
- Sat 22nd Jul 2023 02:28 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sat 22nd Jul 2023 02:28 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sat 22nd Jul 2023 02:28 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Sat 22nd Jul 2023 02:28 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Sat 22nd Jul 2023 02:28 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Sat 22nd Jul 2023 02:28 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Sat 22nd Jul 2023 02:28 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Sat 22nd Jul 2023 02:28 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Sat 22nd Jul 2023 02:28 pm