बामणोली ते दरे शिवसागर जलाशयावर केबल स्टे पुलाच्या बांधकामासाठी तब्बल 300 कोटी रूपयांचा निधी मंजुर

महाबळेश्वर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुळगाव दरे आता रस्ते वाहतुकीने जोडण्यात येणार आहे यासाठी आ. मकरंद पाटील यांनी केलेल्या मागणीच्या आधारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑगस्ट 2022 मधील पुरवणी अर्थ संकल्पात बामणोली ते दरे दरम्यान शिवसागर जलाशयावर केबल स्टे पुलाच्या बांधकामासाठी तब्बल 300 कोटी रूपयांचा निधी मंजुर केले आहेत या शिवाय महाबळेश्वर तालुक्यातील रस्ते व पुलांच्या बाधकामासाठी पुरवणी अर्थ संकल्पात एकुन 463 कोटी रूपयांचा निधी मंजुर केला आहे.

महाबळेश्वर तालुक्याचे सुपुत्र असलेले एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्ाच्या मुख्यमंत्री पदाची सुत्रे आपल्या हाती घेतली आहेत महाबळेश्वर तालुक्यातील दरे हे त्यांचे मुळे गाव असुन ते अत्यंत दुर्गम व डोंगराळ भागात आहे दरे गावाला जाण्यासाठी चांगल्या प्रकरचा रस्ता देखिल उपलब्ध नाही पावसाळयात अनेक वेळा रस्त्या अभावी दरे गावासह अनेक गावांचा संपर्क तुटतो या शिवाय दरे गावाला जल वाहतुकीने देखिल पोहचता येते परंतु हा मार्ग देखिल बिकट आहे पावसाळयात पाणी कमी झाल्या नंतर दरे गावाला पोहचण्यासाठी अनेकांना तारेवरची कसरत करावी लागते मुख्यमंत्री यांनी यावर पर्याय म्हणुन आपल्या दरे गावी दोन हॅलीपॅड तयार केले आहेत पंरतु प्रतिकुल वातावरणात दरे गावाला हेलिकॉप्टरने देखिल पोहचता येत नाही या साठी आता त्यांनी आपले दरे हे गाव थेट रस्ते वाहतुकीने जोडण्याचा निर्णय घेतला आहे त्या साठी त्यांनी बामणोली ते दरे दरम्यान शिवसागर जलाशयावर केबल स्टे पध्दतीचा पुल मंजुर केला आहे या शिवाय या पुलासाठी त्यांनी ऑगस्ट मधील पुरवणी अर्थ संकल्पात 300 कोटी रूपयांचा निधी मंजुर केला आहे या व्यतिरिक्त आ मकरंद पाटील यांनी मागणी केल्या प्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तोपोळा ते आपटी या दरम्यान शिवसागर जलाशयावर मोठा पुल मंजुर केला असुन या पुलासाठी देखिल पुरवणी अर्थ संकल्पात 150 कोटी रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे.

या दोन पुला प्रमाणेच महाबळेश्वर तालुक्यातील रस्त्यांसाठी देखिल आ मकरंद पाटील यांनी काही दिवसां पुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवुन त्यांच्या कडे प्रस्ताव सादर करून रस्त्यांच्या कामासाठी निधीची मागणी केली आ मकरंद पाटील यांनी मागणी केल्या प्रमाणे मुख्यमंत्री यांनी महाबळेश्वर तालुक्यातील रस्त्यांसाठी 63 कोटी रूपये मंजुर केले आहे या मध्ये महाबळेश्वर ते मेटतळे रस्ता दुरूस्ती 6 कोटी रूपये , महाबळेश्वर ते भोसेखिंड रस्ता 11 कोटी रूपये , कोट्ोशी पुल फाटा ते अहीर रस्ता 25 कोटी रूपये , कोट्ोशी पुल ते शिरणार रस्ता दुरूस्ती 12 कोटी रूपये ,लामज ते मोरणी रस्ता सुधारणा 10 कोटी रूपये , कासरूंड हातलोट बिरमणी रसता 4 कोटी रूपये कोट्ोशी ते वेळापुर रस्ता दुरूस्ती 10 कोटी , वेंगळे ते चिखली फाटा रस्ता साडे सात कोटी रूपये अशा प्रकारे ऑगस्ट 2022 मधील पुरवणी अर्थ संकल्पात 63 कोटी रूपये मंजुर केले आहेत.

महाबळेश्व तालुकयातील पुल आणि रस्ते या साठी आ मकरंद पाटील यांनी केलेल्या मागणी नुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 463 कोटी रूपये मंजुर केली असल्याची माहीती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी महेश गोंजारी यांनी दिली.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला