अट्टल दुचाकी चोरट्यास बोरगाव पोलीसांकडून अटक; 4 लाख 28 हजार किमतीच्या 6 दुचाकी जप्त

सातारा : बोरगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकास अट्टल दुचाकी चोरट्यास जेरबंद करण्यात यश आले आहे. यावेळी चोरट्याकडून एकुण 4 लाख 28 हजार रुपये किंमतीच्या 6 दुचाकी पोलिसांनी हस्तगत केला संभाजी बबन जाधव (वय 39, रा. अतीत ता. जि.सातारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत बोरगाव  पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी घरफोडी, चोरी, मोटारसायकल चोरी असे गुन्हे उघडकीस आणून कारवाई करण्याच्या सुचना उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले व सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र तेलतुंबडे यांना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने श्री. रविंद्र तेलतुंबडे यांनी बोरगाव गुन्हे प्रकटीकरण शाखा यांना कारवाईबाबतच्या सुचना दिल्या.


बोरगाव पोलीस ठाणे हद्दीत दि.15/07/2024 रोजी नागठाणे येथुन एक सिल्व्हर निळ्या रंगाची 60 हजार रुपये किंमतीची मोटारसायकल चोरीस गेली होती. याबाबतचा गुन्हा देखील दाखल झाला होता. त्याबाबत रविंद्र तेलतुंबडे यांनी बोरगाव गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस नाईक प्रशांत चव्हाण, केतन जाधव, बाळासाहेब जानकर यांना गुन्हा उघडकीस आणणेबाबत योग्य त्या सुचना दिल्या होत्या. गुन्हेप्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार हे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी त्यांना निसराळे गावच्या हद्दीत पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाखाली सातारा जिल्हा पोलीस अभिलेखावरील माहितगार गुन्हेगार हा विना नंबरप्लेट असलेल्या मोटारसायकलवरुन जात असताना दिसला.

त्याचा संशय आल्यामुळे त्याला थांबवून त्याच्याकडे सदर मोटारसायकल व तिचे कागदपत्राबाबत विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यानंतर त्यास विश्वासात घेत अधिक चौकशी केली असता त्याने सदरची मोटारसायकल ही सातारा शहरातील यशवंतराव चव्हाण कॉलेज परिसरातून चोरुन आणली असल्याचे सांगितले. त्याचेकडे अधिक चौकशी करता त्याने आणखी 3 मोटारसायकल व 2 मोपेड अशी एकुण 6 वाहने नागठाणे, सातारा शहर, खंडाळा या ठिकाणावरुन चोरी करुन अतीत गावच्या हद्दीत लपवुन ठेवलेल्या आहेत असे सांगितले.


सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता 5 वाहने मिळुन आली. सदर वाहनांचा पंचनामा करुन सर्व 6 वाहने जप्त करण्यात आलेली आहेत. सदर इसमाने मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यास सदर गुन्ह्यामध्ये अटक करुन त्याचेकडुन बोरगाव पोलीस ठाणे गुन्ह्यातील चोरीस गेलेली एक सिल्व्हर निळ्या रंगाची हिरो कंपनीची स्प्लॅन्डर आय स्मार्ट मोटारसायकल तसेच आणखी 5 मोटारसायकली अशा एकुण 4 लाख 28 हजार रुपये किंमतीच्या मोटारसायकली हस्तगत केलेल्या आहेत. सदर वाहनांपैकी 3 मोटारसायकलचे चोरीस गेलेबाबतचे गुन्हे खंडाळा, शाहुपुरी व बोरगाव पोलीस ठाणे येथे दाखल आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला