हुमगांवमध्ये परंपारीक पध्दतीने गाईंची पूजा करत वसुबारस साजरी,सेंद्रिय शेतीचा अनमोल संदेश

कुडाळ : दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस हिंदू धर्मात गाईला महत्वाचे स्थान आहे.तिजा सन्मान म्हणून कृतज्ञाता व्यक्त करत हुमगाव ता.जावळी येथे हुमजाईदेवी मंदिरात वसुबारस मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे यासाठी या दिवशी गाईसह पाडसाची संध्याकाळी पुजा करण्याची पध्दत आहे. बसू म्हणजे द्रव्यधन त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे.शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र विभागप्रमुखा  सातारा जिल्ह्यध्यक्ष श्री कमलाकरनाना भोसले यांच्या घरातील गोपन,वा सरु,नंदी आणि राधा,लक्ष्मी या देशी,खिल्लार गायींना यावेळी साडी नेसवून हार फुलांनी सजवत गावातील महिलांनी पारंपारिक पध्दतीने पुजा केली.गाय आणि वासराचे  औक्षण करून वसुबारस उत्साहपूर्वक वातावरणात साजरी केली.भागातील शेतकऱ्यांनी आपल्या घरी देशी खिल्लार गाईचे संगोपन करुन देशी गाईचे दुध आणि दूग्धजन्य पदार्थाचा वापर करावा.शेतीसाठी रासायनिक खताऐवजी गोमूत्र आणि शेणखत वापरुन सेंद्रिय शेती करावी असा संदेशही यावेळी देण्यात आला

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला