मोठी बातमी! बारावीचा निकाल उद्या दुपारी दोन वाजता होणार ऑनलाईन जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे.

बारावीचा निकाल उद्या दुपारी 2 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळांवर जाहीर होणार आहे. राज्यात 21 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान बारावीची परीक्षा पार पडली होती. सुमारे 14 लाख विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती

कुठे पाहता येईल निकाल?

बारावीचे विद्यार्थी https://www.mahahsscboard.in mahresult.nic.in, hscresult.mkcl.org, mahresults.org.in या संकेतस्थळावर आपले निकाल पाहू शकतात.

यासाठी विद्यार्थ्यांना बारावीचा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर हॉल तिकीट क्रमांक आणि इतर डिटेल्स भरल्यानंतर तुमचा निकाल तु्म्हाला कळेल. विद्यार्थी आपला निकाल डाऊनलोड देखील करु शकतात.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला