एकीव धबधब्यामध्ये दोन मुलांचा पडून मृत्यू झालेला नसून त्यांना ढकलल्यामुळे झाला मृत्यू काय आहे नक्की प्रकरण पहा

सातारा : जावळी तालुक्यातील एकीव येथील धबधब्याजवळील ७०० फूट कड्यावरून खाली पडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेचा पोलिसांकडून तपास केला जात होता. तपासादरम्यान या तरुणांचा धबधब्यात पडून नाही तर त्यांना ढकलून देत त्यांचा खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावेळी वादावादी झाल्यानंतर अनोळखी दोन पर्यटकांनी दोघा तरुणांना दरीत ढकलून दिले. हा प्रकार प्रत्यक्षदर्शीने पाहिल्यानंतर पोलिसांनी मेढा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, जावळी तालुक्यातील एकीव धबधब्यावर रविवारी दुपारी पर्यटनासाठी सातारा शहर परिसरातील गावातील काही युवक गेले होते. यामध्ये पंकज शिंदे, समाधान मोरे (रा. बसाप्पाचीवाडी, ता. सातारा) आणि अक्षय अंबवले, गणेश फडतरे हे चाैघेही एकत्र धबधबा पाहण्यासाठी गेले होते. साधारणतः सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पंकज शिंदे आणि समाधान मोरे हे दुचाकीवरून पुढे निघाले. यावेळी त्यांना जाताना पाहताच त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरून अक्षय अंबवले आणि गणेश फडतरे या दोघांनी पाहिले.खूप वेळ झाला तरी ते दोघे अद्याप आले नाहीत म्हणून पंकज शिंदे हा दुचाकीवरून परत त्यांना पाहण्यासाठी आला. त्यावेळी दोन तरुण अक्षयला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत होते. तर त्यांच्यासोबत असलेली इतर मुले रस्त्यावर उभी होती. गणेश फडतरे हा भांडणे सोडविण्यासाठी गेला असता त्यालाही ती मुले मारहाण करू लागली. त्यानंतर त्या दोन मुलांनी अक्षय आणि गणेशला 700 फूट खोल दरीत ढकलून दिले. पंकज शिंदे व त्याचा मित्र समाधान तेथे येताच सर्व मुले तेथून पळून गेली.या प्रकारानंतर पंकजने मेढा पोलिसांना याची माहिती दिली. मेढा पोलिस आणि शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन शोधकार्य सुरू केले. रात्रीचा अंधारासोबत मुसळधार पाऊस पडू लागल्यामुळे दरीत उतरणे अत्यंत धोकादायक होते. अशा अवस्थेतही ट्रेकर्सच्या जवानांनी दरीत उतरून अक्षय शामराव अंबवले (वय 28, रा. बसाप्पाचीवाडी, ता. सातारा), गणेश अंकुश फडतरे (वय 34, रा. करंजे पेठ, सातारा) या दोघांचा मृतदेह रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास दरीतून वर काढला. या दोन्ही मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर या घटनेची नोंद मेढा पोलीस ठाण्यात करण्यात आली.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला