अपहरण करून युवकास लोखंडी पाईपने बेदम मारहाण
- Satara News Team
- Sat 8th Jun 2024 03:40 pm
- बातमी शेयर करा
कराड : बहिणीच्या गावी जेवण करून रात्री उशिरा आपल्या गावाकडे येत असताना वाटेत लघुशंकेसाठी दुचाकी थांबवलेल्या दोन तरुणांमधील एकास पाठीमागून पाठलाग करत आलेल्या कार मधील पाच ते सहा जणांनी पकडून त्यांची दुचाकी फोडून व जबरदस्तीने कारमध्ये बसवून नेऊन लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली. या मारहाणीत युवक गंभीर जखमी झाला आहे. तर त्याच्यासोबत दुचाकीवरून आलेल्या दुसऱ्या युवकाने अंधाराचा फायदा घेत पोबारा करून आपला जीव वाचवला. शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास शिवनगर (रेठरे बुद्रुक) ते शेनोली स्टेशन या दरम्यान ही घटना घडली. याबाबत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात सुरू आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कराड जवळच्या कार्वे गावातील दोन युवक दुचाकीवरून शुक्रवारी सायंकाळी त्यामधील एकाच्या इस्लामपूर जवळ असलेल्या बहिणीच्या गावी जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर ते दुचाकीवरून घराकडे परतत होते. यादरम्यान शिवनगर येथून शेणोली स्टेशनकडे येताना गोंदी परिसरात लघुशंका आल्याने त्यांनी दुचाकी थांबवली.
ही संधी साधून पाठीमागून पाठलाग करत आलेल्या कार मधील पाच ते सहा जणांनी त्यांच्या दुचाकी जवळ कार थांबून ते गाडीतून खाली उतरले. त्यांनी दुचाकी वरील दोघांमधील एकास पकडले. शिवीगाळ व मारहाण सुरू केली. त्यामुळे घाबरून दुचाकी वरील दुसरा तरुण जीव वाचवण्यासाठी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. त्यानंतर कार मधील पाच ते सहा हल्लेखोरांनी लोखंडी पाइपने आणि दगड मारून त्यांची दुचाकी फोडली. त्यानंतर त्यांनी पकडलेल्या युवकास कारमध्ये जबरदस्तीने बसवून काही अंतर दूर नेऊन लोखंडी पाईपने त्याच्या पाठीवर, गुडघ्यावर, दंडावर, पोटावर बेदम मारहाण केली.
घटनास्थळावरून पळून आलेल्या युवकाने गावात आल्यानंतर या घटनेची माहिती दिली. त्यानंतर रात्री ग्रामस्थ तातडीने घटनास्थळाकडे , गोंदी परिसरात , शिवनगर, रेठरे बुद्रुक , किल्ले मच्छिंद्रगड , इस्लामपूर परिसरात शोधाशोध करू लागले. त्यानंतर अपहरण झालेल्या युवकाचा शोध लागला. पहाटे कराड ग्रामीण पोलिसांना याबाबत माहिती देऊन संबंधित युवकाला वैद्यकीय उपचार देण्यात आले. शनिवारी सकाळी कराड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी चौकशीचे काम सुरू केले होते. याबाबत कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे या घटनेचा सविस्तर तपशील समजू शकलेला नाही.
गुन्हयाला वेगळे वळण देण्याचा प्रकार…
"या गुन्ह्यातील हल्लेखोरांनी युवकाचे अपहरण केल्यानंतर त्याला दूर नेऊन मारहाण केली. त्यानंतर हल्लेखोरांनी हा गुन्हा अन्य पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचा बनाव रचला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र यामध्ये कितपत तथ्य आहे, याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे."
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी…
"सर्व घटना विचारात घेता हा हल्ल्याचा प्रकार गंभीर आहे. या प्रकारातून किंवा अशा घटनांमधून पुढे आणखी गंभीर घटना घडू नयेत, यासाठी पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या प्रकरणात लक्ष घालावे व योग्य ती कारवाई करण्याचे आदेश कराड ग्रामीण पोलिसांना द्यावेत, अशी मागणी होत आहे."
#karad
स्थानिक बातम्या
अंधश्रद्धेपोटी मृतदेहाचे अवशेष चारही दिशांना टाकून दाखविला नैवेद्य ?
- Sat 8th Jun 2024 03:40 pm
खून प्रकरणात अरुण कापसेच 'शार्क मासा'
- Sat 8th Jun 2024 03:40 pm
तारळी प्रकल्पग्रस्त मारुती जाधव यांचा प्रजासत्ताक दिनी उपोषणाचा इशारा
- Sat 8th Jun 2024 03:40 pm
फलटण तालुक्यातील विडणी गावाच्या शिवारात एका महिलेचा अर्धवट अवस्थेतला मृतदेह आढळला
- Sat 8th Jun 2024 03:40 pm
दहिवडी पोलीस ठाणे जिल्ह्यात नंबर वन..
- Sat 8th Jun 2024 03:40 pm
पुसेसावळीच्या सोळा वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कराड उत्तरचे आमदार आपल्या दारी
- Sat 8th Jun 2024 03:40 pm
संबंधित बातम्या
-
अंधश्रद्धेपोटी मृतदेहाचे अवशेष चारही दिशांना टाकून दाखविला नैवेद्य ?
- Sat 8th Jun 2024 03:40 pm
-
खून प्रकरणात अरुण कापसेच 'शार्क मासा'
- Sat 8th Jun 2024 03:40 pm
-
फलटण तालुक्यातील विडणी गावाच्या शिवारात एका महिलेचा अर्धवट अवस्थेतला मृतदेह आढळला
- Sat 8th Jun 2024 03:40 pm
-
अंधारी खूनप्रकरणी पैलवानाला अटक
- Sat 8th Jun 2024 03:40 pm
-
जलसागरचा 'मासा' गळातून निसटला कि सोडला?; अंधारी ग्रामस्थांच्या संशयावरुन चर्चेला उधाण
- Sat 8th Jun 2024 03:40 pm
-
कण्हेर धरणालगतचा 'तो' मासा पोलिसांच्या गळाला; अरुण कापसेला खून प्रकरणात अटक
- Sat 8th Jun 2024 03:40 pm
-
दहिवडीत 15 हजारांची लाच घेताना अभियंत्यासह ठेकेदारास रंगेहाथ पकडले
- Sat 8th Jun 2024 03:40 pm
-
पाचगणीत बारबालांचा पुन्हा नंगानाच ,,,हॉटेल हिराबाग (बिलीव्ह) यथे पोलिसांचा छापा; २० जण ताब्यात
- Sat 8th Jun 2024 03:40 pm