वाहून गेलेला पूल माजी पालकमंत्र्याने 5 तासात उभारला
Satara News Team
- Tue 2nd Aug 2022 11:55 am
- बातमी शेयर करा
या घटनेचे गांभीर्य ओळखून आमदार बाळासाहेब पाटील यांनी तात्काळ दखल घेऊन प्रशासनाच्या मदतीने कामाला सुरुवात केली. ओढ्यात सिमेंटच्या मोठी नळीपाईप, दगड, गोटे मुरूम टाकून पूल बांधण्यात आला.आणि अवघ्या काही तासातच पुन्हा हा पुल वर्दळीसाठी सुरू करण्यात यश आले आहे.
कण्हेरखेड : शिंदे सरकारला एक महिना उलटूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे. यामुळे राज्याला अद्यापही कृषी मंत्री मिळाला नाही. तर पालकमंत्र्यांचीही घोषणा झाली नसल्याने आपल्या समस्या कोणासमोर मांडाव्यात, असा प्रश्न जनतेसमोर आहे. अशात सरकारची वाट न पाहता राष्ट्रवादीच्या माजी पालकमंत्र्याने आपले पालकत्व निभावले आहे. याचे सर्वत्रच कौतुक होत आहे.कोरेगाव तालुक्यातील कण्हेरखेड, एकंबे, शिरंबे आणि कोरेगावला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पूल मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर्णतः वाहून गेला होता. यामुळे नागरिकांना धोकादायक पद्धतीने ओढा ओलांडून जावं लागत होते. परिसरातील नागरिकांना 24 किलोमीटर प्रवास करून जावे लागत असल्याने मोठी फरपट होताना पाहायला मिळत होती. याबाबत गावातीलच ग्रामस्थांनी माजी पालकमंत्री तथा आमदार बाळासाहेब पाटील यांना याबाबतचे फोटो आणि व्हिडिओ मोबाईलवर पाठवून माहिती दिली.या घटनेचे गांभीर्य ओळखून आमदार बाळासाहेब पाटील यांनी तात्काळ दखल घेऊन प्रशासनाच्या मदतीने कामाला सुरुवात केली. ओढ्यात सिमेंटच्या मोठी नळीपाईप, दगड, गोटे मुरूम टाकून पूल बांधण्यात आला.आणि अवघ्या काही तासातच पुन्हा हा पुल वर्दळीसाठी सुरू करण्यात यश आले आहे.दरम्यान, अनेक राजकीय व्यक्ती आपले सरकार गेल्यानंतर केवळ टीका-टीप्पण्यांचे काम करते. परंतु, अशात महाविकास आघाडीची सत्ता नसनाही राजकारण बाजूला ठेवून माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पालकत्व निभावले. यामुळे ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
#sataranews
स्थानिक बातम्या
यशोशिखर! चि. रियांश संतोष देशमुख याचे इ. ५ वी स्कॉलरशिप व सैनिक स्कूल परीक्षेत दैदिप्यमान यश
- Tue 2nd Aug 2022 11:55 am
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Tue 2nd Aug 2022 11:55 am
देऊर रेल्वे गेट दोन दिवस बंद; सातारा–लोणंद मार्गावरील वाहतुकीत मोठा बदल
- Tue 2nd Aug 2022 11:55 am
खटाव (वडूज)चं तहसिल कार्यालय काय करायलंय?
- Tue 2nd Aug 2022 11:55 am
पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या संजय दिना पाटील यांचा निषेध
- Tue 2nd Aug 2022 11:55 am
संबंधित बातम्या
-
महाबळेश्वरच्या विकासस्वप्नाला अखेर हिरवा कंदील!
- Tue 2nd Aug 2022 11:55 am
-
सातारा जिल्ह्यातील शिवसेनेत शीतयुद्ध; लाभार्थ्यांची टोळी विरुद्ध निष्ठावंत - रणजितसिंह भोसले
- Tue 2nd Aug 2022 11:55 am
-
पदांसाठी मुलाखतींना चंद्रकांत जाधव यांचा कडाडून विरोध
- Tue 2nd Aug 2022 11:55 am
-
फलटण शहर व तालुक्यातील निवासी अतिक्रमणे नियमित करणार.मा . खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
- Tue 2nd Aug 2022 11:55 am
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Tue 2nd Aug 2022 11:55 am
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Tue 2nd Aug 2022 11:55 am
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Tue 2nd Aug 2022 11:55 am













