देऊर रेल्वे गेट दोन दिवस बंद; सातारा–लोणंद मार्गावरील वाहतुकीत मोठा बदल
Satara News Team
- Mon 29th Jun 2026 06:45 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा–लोणंद महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी. वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देऊर येथील रेल्वे गेट क्रमांक ४७ वर रेल्वे क्रॉसिंगच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे हे रेल्वे गेट दोन दिवस सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असून, पर्यायी मार्गांची घोषणा करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालय, सातारा यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, १ जुलै २०२६ रोजी सकाळी ७ वाजल्यापासून २ जुलै २०२६ रोजी रात्री ९ वाजेपर्यंत देऊर येथील रेल्वे गेट पूर्णपणे बंद राहणार आहे.
या काळात वाहतुकीसाठी खालीलप्रमाणे पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
फलटण आणि लोणंदकडून साताऱ्याकडे येणारी अवजड वाहने खंडाळा–शिरवळ मार्गे पुणे–बंगळुरू महामार्गाने साताऱ्याकडे वळविण्यात येतील.
साताऱ्याकडून लोणंद–फलटणकडे जाणारी अवजड वाहने वाडे फाटा–खंडाळा–शिरवळ मार्गे पुढे जातील.
फलटण व लोणंदकडून साताऱ्याकडे येणारी हलकी वाहने आडर्की फाटा–वाठार–तडवळे–पिंपोडे बुद्रुक–दहिवाडी–देगाव मार्गे सातारा किंवा कोरेगावकडे जाऊ शकतील.
सातारा व कोरेगावकडून लोणंद–फलटणकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांसाठीही हाच पर्यायी मार्ग लागू राहील.
विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसांना या पर्यायी मार्गावरून ये-जा करण्यास विशेष परवानगी देण्यात आली आहे.
देऊर येथील रेल्वे गेट क्रॉसिंग या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णपणे बंद राहणार असून, नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
देऊर रेल्वे गेट बंद राहणार असल्याने सातारा–लोणंद मार्गावरील प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन पर्यायी मार्गांचा वापर करून करावे, असे आवाहन सातारा पोलिसांनी केले आहे.
स्थानिक बातम्या
देऊर रेल्वे गेट दोन दिवस बंद; सातारा–लोणंद मार्गावरील वाहतुकीत मोठा बदल
- Mon 29th Jun 2026 06:45 pm
खटाव (वडूज)चं तहसिल कार्यालय काय करायलंय?
- Mon 29th Jun 2026 06:45 pm
पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या संजय दिना पाटील यांचा निषेध
- Mon 29th Jun 2026 06:45 pm
सराईत घरफोड्या चोरट्याच्या टोळीचा पर्दाफाश; 27.65 लाखांचा मुद्देमाल जप्त
- Mon 29th Jun 2026 06:45 pm
सातारा न्यूजचा दणका, अन्न व औषध प्रशासनाकडून फलटणमध्ये मोठी कारवाई
- Mon 29th Jun 2026 06:45 pm
कॉपर वायर व ट्रान्सफॉर्मर चोरी करणारी टोळी गजाआड; 26 गुन्ह्यांची उकल, 20.22 लाखांचा मुद्देमाल जप्त.
- Mon 29th Jun 2026 06:45 pm
संबंधित बातम्या
-
औंध पोलिस ठाण्यातील सर्व कारभारच गोपनीय...?
- Mon 29th Jun 2026 06:45 pm
-
बिटलेवाडी-सातारा नवीन एसटी बस सेवेचा शुभारंभ; ग्रामस्थांकडून जल्लोषात स्वागत!
- Mon 29th Jun 2026 06:45 pm
-
पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या संजय दिना पाटील यांचा निषेध
- Mon 29th Jun 2026 06:45 pm
-
माजी उपसभापती चंद्रकांत कदम (पाटील) यांचे निधन.
- Mon 29th Jun 2026 06:45 pm
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Mon 29th Jun 2026 06:45 pm
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Mon 29th Jun 2026 06:45 pm











