पदांसाठी मुलाखतींना चंद्रकांत जाधव यांचा कडाडून विरोध
सहा महिन्यांपूर्वी आलेले मुलाखती घेणार का ? रोकडा सवालSatara News Team
- Thu 11th Jun 2026 08:13 pm
- बातमी शेयर करा
सातारा - शिवसेना शिंदे गटात आता पदे देण्यासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार असून त्यामुळे अनेक वर्षे शिवसेनेत झोकून देऊन काम करणाऱ्या चंद्रकांत जाधव यांच्यासारख्या पदाधिकाऱ्यांचा आत्मसन्मान दुखावला गेला आहे. त्यांनी या प्रकाराला कडाडून विरोध केला असून तीस - तीस वर्षे पक्षासाठी घासणाऱ्यांच्या मुलाखती सहा महिन्यांपूर्वी पक्षात आलेले लोक घेणार का ? असा रोकडा सवाल त्यांनी केला आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण व माण - खटाव विधानसभा मतदार संघातील शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख पदांच्या निवडीसाठी शिवसैनिकांच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम शिवसेनेकडून जाहीर करण्यात आल्यामुळे ही ठिणगी पडली आहे. रविवार दि. १४ जून रोजी कोळकी (फलटण) येथील अनंत मंगल कार्यालयात सकाळी ११ ते १२.३० दरम्यान फलटण विधानसभा आणि १२.३० ते २ या वेळेत माण - खटाव विधानसभा मतदारसंघासाठीच्या मुलाखती होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या मुलाखती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक - निंबाळकर, माढा लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख चंद्रहार पाटील, सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे व महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख रेश्मा जगताप हे घेणार असल्याचे त्यामध्ये म्हटले आहे.
अनेक वर्षे शिवसेनेत कार्यरत असलेल्या लोकांच्या मुलाखती घेण्याची कल्पनाच ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा आत्मसन्मान दुखावणारी ठरली आहे. त्यातही मुलाखती घेण्यासाठी कोणाची नावे पुढे केली आहेत यावरच पदाधिकाऱ्यांचा आक्षेप आहे. यामध्ये गेली अनेक वर्षे सातारा जिल्ह्यातील एक लढाऊ शिवसेनिक म्हणून ओळख असलेल्या विद्यमान जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांचा समावेश आहे. त्यांनी या निवड प्रक्रियेला कडाडून विरोध करत संताप व्यक्त केला आहे.
फलटणच्या राजे गटाचा शिवसेनेत प्रवेशच मुळात चंद्रकांत जाधव यांच्या पुढाकारातून झाला होता. आता चंद्रकांत जाधव यांनाच पदावर ठेवायचे की नाही ते संजीवराजे ठरवणार असतील तर अजब तुझे सरकार असेच म्हणावे लागेल. शिवसेनेत सहा महिन्यांपूर्वी आलेले संजीवराजे, रेश्मा जगताप व चंद्रहार पाटील हे तीस वर्षांपासून पक्षासाठी कार्यरत असलेल्यांची मुलाखत घेणार का ? असा सवाल चंद्रकांत जाधव यांनी पक्षाला केला आहे. यातील कोणी जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावरच्या लढाया लढल्या आहेत ? यांच्यावर किती केसेस पडल्या आहेत ? यांनी किती नवीन शिवसैनिक तयार केले आहेत ? पक्ष वाढीसाठी यांचे योगदान काय आहे ? असे सवालही त्यांनी केले आहेत.
उद्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक
दरम्यान, या मुलाखतींच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक चंद्रकांत जाधव यांनी शनिवारी (दि. १३) सायंकाळी पाच वाजता सातारा येथे बोलावली असून जिल्ह्यातील सर्व आजी-माजी पदाधिकारी व शिवसैनिकांनी या बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
स्थानिक बातम्या
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Thu 11th Jun 2026 08:13 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Thu 11th Jun 2026 08:13 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Thu 11th Jun 2026 08:13 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Thu 11th Jun 2026 08:13 pm
नो रिअल ....हो! अगदी खरं आहे. रील च्या चक्कर मध्ये आपण रिअल राहिलो नाही.
- Thu 11th Jun 2026 08:13 pm
संबंधित बातम्या
-
हातगेवर विकास सेवा सोसायटीत कर्जप्रकरणी फसवणुकीचा आरोप; सहाय्यक पोलीस निरीक्षक, मेढा यांच्याकडे तक्रार दाखल
- Thu 11th Jun 2026 08:13 pm
-
फलटण शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी प्रथमच मोठा भरीव 70 कोटींचा निधी.
- Thu 11th Jun 2026 08:13 pm
-
नगराध्यक्ष समशेरसिंह यांनी उघड केला नगर परिषदेतील कर घोटाळा, अनेक वर्षापासून सुरू होता कर घोटाळा
- Thu 11th Jun 2026 08:13 pm
-
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Thu 11th Jun 2026 08:13 pm
-
कसं काय पाटील बर हाय का विधानसभेत जे ऐकले ते खर आहे का? ॲड. संदीप कांबळे.
- Thu 11th Jun 2026 08:13 pm
-
महाबळेश्वरच्या विकासस्वप्नाला अखेर हिरवा कंदील!
- Thu 11th Jun 2026 08:13 pm












