पहिले सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष जोतीबा फुले
Satara News Team
- Tue 11th Apr 2023 09:57 am
- बातमी शेयर करा
जोतीराव फुलेनी सत्यशोधक समाजाची स्थापना २४ सप्टेंबर १८७३ रोजी केली.समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजा पयॅत शिक्षण पोहोचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते .फुलेनी शिक्षणाच महत्व सांगितले आहे की ,
"विद्येविना मति गेली;मतिविना नीती गेली;
नीतीविना गति गेली |
नीतीविना वित्त गेले; वित्ताविना शूद्र खचले,"
इतके अनर्थ एका अविद्येने केले.
. पहिले सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष जोतीबा फुले होते. जोतीबा यांनी सत्यशोधक समाजातफॅ 'दीनबंधू' नावाचे साप्ताहिक सुरू केले. महात्मा फुले ,भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मनिरपेक्ष, समाजवादी, जातीपातीविरहित ,सुखी ,संपन्न समाजाचे स्वप्न पाहिले .त्या साठी दोघांनी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावले . १८७३ साली फुलेनी 'दीनबंधू 'मध्ये जात आणि अंधश्रद्धा या विषयावर ही वारंवार लेख लिहले . . जाती जातील शुद्रपणा आणि श्रेष्ठत्व यामुळे समाजा समाजामध्ये फार मोठी दरी निर्माण झाली होती . जाती निर्मूलन साठी तसेच अंधश्रद्धा निर्मूलन साठी जोतीबा आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजीक पातळीवर त्यांनी खालच्या जातीतील लोकांसाठी आपले जीवन समर्पित केले. फुले या नररत्नाचा गौरव "महात्मा "ही पदवी समाजसुधारक विठ्ठलराव कृष्णाजी वांढेकर यांनी ज्योतिराव फुले यांना दिली होती .
१४ एप्रिलरोजी. डाॅ बाबासाहेब आंबेडकर
. यांची जयंती आणि महात्मा फुले यांची जयंती ११ एप्रिल संपूर्ण भारतभर साजरी केली जाते. भारतीय समाजातील त्यावेळच्या दुष्कृत्यशी ,त्यांनी जाती जातीतील भेदभाव त्या काळात होता.. मात्र फुले यांनी आणि डाॅ आंबेडकर याना समाजातील दलित लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र व जीवनभर प्रयत्न केला.
फुले यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे जोतीबाचे ब्रीज होते.एक दिवशी ते रायगडला गेले .तेथिल छत्रपती शिवरायांच्या समाधीची दुरावस्था पाहुन त्यांना खूप वाईट वाटले. त्यांनी समाधी साफसूप केली .छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, त्याचे ,धाडस, पराक्रम, त्यांची अखंड सावधानता , त्यांचे निमॅळ चारित्र्य, त्यांची दूरदृष्टी यावर जोतीबानी स्तुतीसुमने उधळली. महाराजांच्या कायाॅकडे लोकांचे लक्ष वेधले महाराजांच्या कर्तृत्वतत्वावर त्यांनी एक पोवाडाही रचला. त्यांनी पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्या सुरूवात केली.समाजक्रांतीचे जनक,आणि भारतातील सामान्य जनतेच्या नवयुगाचा प्रेषित असा त्यांचा थोडक्यात पण साथॅ उल्लेख करता येईल.
स्त्रीया, कामगार ,शेतकरी,शिक्षण यांच्या प्रश्नाप्रमाणे दलित वर्गाच्या दैन्य अवस्थेकडे समाजाचे आणि फुलेनी सरकारचे लक्ष वेधले. अखंड परिश्रमाने ,असामान्य त्यागाने जोतीराव देहाने झिजले व थकले होते.ते आजारी पडले आणि
या थोर समाजसुधारकाचा मृत्यू २८नोहेबर १८९० झाला.या महामानवाला माझा मानाचा मुजरा.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Tue 11th Apr 2023 09:57 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Tue 11th Apr 2023 09:57 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Tue 11th Apr 2023 09:57 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Tue 11th Apr 2023 09:57 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Tue 11th Apr 2023 09:57 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Tue 11th Apr 2023 09:57 am
संबंधित बातम्या
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Tue 11th Apr 2023 09:57 am
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Tue 11th Apr 2023 09:57 am
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Tue 11th Apr 2023 09:57 am
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Tue 11th Apr 2023 09:57 am
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Tue 11th Apr 2023 09:57 am
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Tue 11th Apr 2023 09:57 am
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Tue 11th Apr 2023 09:57 am
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Tue 11th Apr 2023 09:57 am











