सातारा शहरात आ. शिवेंद्रराजेंच्या पदयात्रांचा धडाका सुरु

सातारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; मताधिक्य देण्याचा सातारकरांचा निर्धार

सातारा- सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सातारा शहरात पदयात्रांचा धडाका आजपासून सुरु झाला. सातारा शहरात आ. शिवेंद्रराजेंच्या पदयात्रांचा धडाका सुरु  सकाळी गारेच्या गणपतीचे दर्शन घेऊन पदयात्रेला सुरुवात झाली. पदयात्रेत भाजपसह, महायुतीतील घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सातारा विकास आघाडी व नगर विकास आघाडीचे सर्व आजी- माजी पदाधिकारी, सर्व आजी- माजी नगरसेवक यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते. पदयात्रेदरम्यान नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन शिवेंद्रराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला. 


मंगळवारी सकाळी गारेचा गणपतीची विधिवत पूजाअर्चा करून शिवेंद्रराजेनी गणपतीचे दर्शन घेतले आणि पदयात्रेला सुरुवात झाली. वाजतगाजत निघालेली पदयात्रा गारेचा गणपती, कारंडबी नाका, मोरे कॉलनी, कृष्णेश्वर पार्क, गोखले हौद, न्हावी आळी, मंगळवार तळे, विठोबाचा नळ, जलमंदिर ते सुरुची या मार्गावरून काढण्यात आली. ठिकठिकाणी पदयात्रेचे फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आले. पदयात्रेत हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाल्याने पदयात्रा मार्गाला यात्रेचे स्वरूप आले होते. पदयात्रामार्गावर ठिकठकाणी माता- भगिनींनी शिवेंद्रराजेंचे औक्षण करून त्यांना आशीर्वाद दिले. शिवेंद्रराजेंनी मार्गावरील प्रत्येक घरात जाऊन नागरिकांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांच्याशी संवाद साधला. 

आ. शिवेंद्रराजे म्हणाले, सातारकरांच्या सर्व प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी आपण नेहमीच कटिबद्ध राहिलो आहे. रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सर्वच रस्ते काँक्रीटचे करण्यासाठी आगामी काळात उपाययोजना केल्या जातील. कास धरणाची उंची वाढवल्यामुळे पाणीप्रश्न कायमचा सुटण्यास मदत झाली आहे. महायुती सरकारच्या साथीमुळे संपूर्ण सातारा- जावली मतदारसंघात हजारो कोटींची विकासकामे झाली आहेत. विकासासाठी महायुती शिवाय पर्याय नाही. त्यामुळे सातारकरांनी महायुतीच्या मागे खंबीरपणे उभे राहून आपल्या शहराचा विकास अखंडित ठेवण्यासाठी साथ द्यावी. विक्रमी मताधिक्य  देऊन मला विजयी करा आणि आपल्या सातारकरांची ताकद विरोधकांना दाखवून द्या, असे आवाहन शिवेंद्रजेंनी केले. 


बुधवार दि. ६ रोजी सकाळी ७ वाजता अदालतवाडा, वाघाची नळी, पटवर्धन बोळ, कमानी हौद, कूपर कारखाना ते नगरपालिका शाहू चौक अशी पदयात्रा होणार आहे तसेच सायंकाळी ६.३० वाजता गुरवार परज आणि रात्री ८ वाजता एस. टी. कॉलनी मैदान शाहूनगर येथे कोपरा सभा होणार आहे. पदयात्रा व कोपरा सभेला सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 



आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला