प्रियंका संकपाळ-जाधव एआयबीई परीक्षेत देशात प्रथम

सातारा:   अखिल भारतीय बोर्ड विशेषज्ञ परीक्षेमध्ये महाराष्ट्र अंगुली मुद्रा केंद्र विभागातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रियंका संकपाळ-जाधव यांनी सुयश मिळवत देशात पहिला येण्याचा मान मिळवला. दिल्ली येथील नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो यांच्या वतीने ही परीक्षा घेण्यात आली होती.या परीक्षेत  त्यांनी २५० पैकी २२४ गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक मिळवत,साताऱ्याच्या शिरपेचात यशाचा तुरा खोवला आहे.
      केंद्रीय परीक्षेत संकपाळ-जाधव या बहुमान मिळवणाऱ्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. त्यांच्या या यशाबद्दल केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. 
        तब्बल २० वर्षांनंतर त्यांनी फिंगरप्रिंट विभागाची मानाची समजली जाणारी सर अजीज-उल-हक ट्रॉफी महाराष्ट्राला मिळवून दिली. या परीक्षेत देशातील विविध राज्यातील एकूण ७६ फिंगरप्रिंटचे अधिकारी उपस्थित होते. ही परीक्षा लेखी, प्रात्यक्षिक व मुलाखत स्वरूपात घेण्यात आली होती. विशेष म्हणजे फिंगरप्रिंट विभागातील अत्यंत कठीण परीक्षेत त्यांनी हे यश मिळवले आहे.
प्रियंका संकपाळ-जाधव या सध्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून सीआयडी पुणे येथे कार्यरत आहेत.  सातारा तालुक्यातील अतिदुर्गम अशा धावली गावच्या त्या रहिवासी आहेत.
यावेळी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पोलीस अधीक्षक (आर्थिक गुन्हे शाखा) पंकज देशमुख,अंगुली मुद्रा केंद्र पोलीस अधीक्षक श्रीरंग टेकवडे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोहिदास कसार आदी उपस्थित होते.
त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

मुख्यमंत्र्यांनीही केले विशेष अभिनंदन
फिंगरप्रिंट एक्सपर्ट या परीक्षेत यश मिळवलेल्या महाराष्ट्रातील पोलीस उपनिरीक्षक प्रियंका संकपाळ-जाधव यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. फिंगरप्रिंट विभागातील सर्वांत आव्हानात्मक आणि अवघड अशा या परीक्षेत उत्तीर्ण होऊन संकपाळ यांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे. आपल्या देशाला, राज्याला चांगल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची गरज आहे. हे उमेदवार नागरी सेवेमध्ये ज्या ठिकाणी नियुक्त होतील त्याठिकाणी आपल्या कामाचा ठसा निश्चितपणे उमटवतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

दिल्ली- फिंगरप्रिंट विभागाच्या एआयबीई परीक्षेत देशात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक प्रियंका संकपाळ-जाधव यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात

वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला