माण चे आमदार जयकुमार गोरे कॅबिनेट मंत्री!

फलटण :  सातारा जिल्ह्यातील माण खटाव विधानसभा मतदारसंघाचे चौकार मारलेले आमदार श्री. जयकुमार गोरे यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे अशी खात्रीशीर माहिती समोर येत आहे. सातारा जिल्ह्यातील राजकारणात आपल्या राजकीय रुबाबाने प्रशासकीय धबधबा कायम ठेवणारे माण खटाव चे आमदार श्री जयकुमार गोरे आज कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेणार अशी खात्री लाईक माहिती समोर येत आहे.

 श्री जयकुमार गोरे यांच्या कुटुंबामध्ये कोणताही राजकीय वारसा नसताना आत्मविश्वासाने राजकारणामध्ये सक्रिय होऊन भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज ते चौथ्यांदा आपल्या मतदारसंघात विधानसभेला विजयी झालेले आहेत. आमदार श्री जयकुमार गोरे यांनी आपल्या राजकारणाचा श्री गणेशा सातारा जिल्हा परिषदेच्या राजकारणापासून केलेला आहे कोणत्या पक्षाचा झेंडा खांद्यावर न घेता अपक्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी माण तालुक्यामध्ये राजकीय पटलावर आपलं स्थान निश्चित केले होते. राजकारणाची पायाभरणी करून पहिल्यांदा अपक्ष आमदार म्हणून माण खटाव विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले होते. त्यानंतर काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टीच्या वतीने जयकुमार गोरे हे निवडून गेलेले आहेत. कोणताही राजकीय वारसा नसणाऱ्या कुटुंबातून स्वतःच्या सह कर्तृत्वाने राजकारणात आपले भरभक्कम स्थान त्यांनी सातारा जिल्ह्यात आपल्या कर्तुत्वाने निश्चित केले आहे. 

आमदार जयकुमार गोरे यांचे राजकीय पटलावर असणारे स्थान गोठवण्यासाठी सातारा जिल्ह्यातील बऱ्याच दिग्गजांनी अनेकदा प्रयत्न केले पण त्यांच्या प्रयत्नांना कधीही यश आले नाही असे जयकुमार गोरे नेहमीच विविध माध्यमातून व्यक्त होताना आढळून आले आहे. मी मान खटाव तालुक्याच्या जनतेचा एक जनसेवक म्हणून नेहमी जनसेवा करीत असतो माझ्या राजकारणाचा यशस्वी आलेख हा मान खटाव च्या जनतेची सामाजिक बांधिलकी आणि समाजसेवा हाच आहे असे प्रतिपादन ते नेहमी करतात. माण खटाव हा कायम दुष्काळी पट्टा असणारा भाग पण मागील चार विधानसभेत मान खटाव तालुक्यातील जनतेने नेहमीच विकासाच्या दृष्टीने न्याय देणारा लोकप्रतिनिधी म्हणून याही विधानसभेच्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने त्यांना निवडून दिले आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांच्या या कार्याचा गौरव आणि माण खटाव मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी कॅबिनेट मंत्रीपदाची दाट शक्यता आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त