मनोजदादांना विधानभवनात पाठवायचा आहे...आमदार महेशदादा शिंदे

 देशमुखनगर :   निगडी तालुका सातारा येथे 25 लाख रुपये किमतीच्या अंतर्गत रस्त्याच्या ट्रीमिक्स काँक्रीट करण्याच्या उद्घाटनप्रसंगी आमदार महेशदादा शिंदे साहेब यांनी  मनोजदादा घोरपडे यांना कराड उत्तर मधून आमदार म्हणून विधानभवनात पाठवायचं आहे असे उदगार काढले याप्रसंगी भाजपा नेते मा. मनोजदादा घोरपडे पंचायत समिती सदस्य मा. संजयबाबा घोरपडे तसेच गावचे सरपंच माननीय संतोष मांडवे यांची प्रमुख उपस्थिती होती
     कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील निगडी येथे कोरेगावचे आमदार महेशदादा शिंदे व वर्णे जिल्हा परिषद गटाचे नेते मनोजदादा घोरपडे यांच्या माध्यमातून 95 लाख रुपये किमतीचे विकास कामांचे उद्घाटन व 25 लाख रुपये किमतीच्या  विकास कामांचे  भूमिपूजन कार्यक्रम पार पडला यावेळी बोलताना माननीय महेशदादा शिंदे साहेब म्हणाले या विभागांमध्ये मी आज जरी आमदार झालो असेल तरी मनोजदादा यांचे या विभागांमध्ये प्रेमाचे  आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत प्रत्येकाच्या घरात आणि मनात मनोजदादा विषयी आत्मीयता आहे. मागच्या विधानसभेला काही कारणास्तव त्यांना विधान भवनात जात आले नाही परंतु येणारे 2024 ला यांना आपल्याला सगळ्यांना मिळून विधानभवनात पाठवायचा आहे त्यासाठी माझी संपूर्ण ताकद मी  त्यांच्यासाठी खर्च करणार असून निगडी सारख्या छोट्याशा गावामध्ये आज एक कोटी पेक्षा जास्त निधी आणला असून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा संपूर्ण मतदारसंघांमध्ये पूर्ण ताकतीन विकास कामांचा बॅकलॉग भरून काढणार असून प्रत्येक गावामध्ये प्रत्येक नागरिकांनी किमान पाच तरी झाडे लावावी ज्या माध्यमातून पर्यावरणाचा ऱ्हास कमी होऊन तापमान नीयत्रित राहील. ज्या गावांमध्ये वृक्षारोपण होईल त्या गावांमध्ये जास्तीत जास्त विकास कामे देण्यासाठी कटिबद्ध असेल असे आव्हान यावेळी महेशदादा शिंदे यांनी केले. 
        यावेळी बोलताना मा. मनोजदादा म्हणाले आजपर्यंत माझ्या राजकीय जडणघडणीत या विभागाचा फार मोठा वाटा आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने आपण सर्वांनी साथ करून या विभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आमदार महेशदादा शिंदे यांना साथ देऊयात.आपण सर्वजण सुज्ञ आहात केवळ मतासाठी येऊन नारळ फोडणाऱ्या लोकांपासून सावध राहण्याची वेळ असून ज्यांना संपूर्ण मतदारसंघात कोणीही थारा देत नाही अशा लोकांपासून आपल्याला आता सावध राहावे लागणार आहे .संपूर्ण लोकांच्या कल्याणासाठी  काम करतो त्याच्या पाठीमागे आपल्याला आपली ताकद उभी करावी लागणार आहे. जेवढी अपेक्षा आपण  महेशदादा शिंदे यांच्याकडून केली होती त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त त्यांनी आपले काम केलेली आहे. त्याच पद्धतीने आपण समजून घेऊन त्यांच्या पाठीमागे राहूया जेणेकरून या विभागाचा सर्वांगीण विकास होईल.
   यावेळी पंचायत समिती सदस्य संजय बाबा घोरपडे माननीय अरुण चिखले गुरुजी ,आनंदराव मांडवे गुरुजी ,यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास सुमन मांडवे,दीपक मांडवे, मधुकर चिखले, कृष्णात शेडगे, भरत मांडवे, गजानन चिखले, विलास मांडवे, आकाश घमरे, संतोष मांडवे, विलास मांडवे, समाधान शिदे , रफीक शेख, अण्णा शेळके, मानसिंग काळंगे, किरण येवले, किरण पवार, दत्ता मोरे, किशोर पवार,गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य सोसायटी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयवंत जाधव यांनी केले असून कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माननीय संदीप मांडवे यांनी केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला